शिवजयंतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला केलं 'हे' आवाहन...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. या सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र येऊन राज्याचा कारभार सांभाळत आहेत. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीची विचारसरणी.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारसरणी विरुद्ध शिवसेनेची हिंदुत्वाची विचारसरणी. अशात शिवसेनेला दोनही काँग्रेससोबत चालताना तारेवरची कसरत करावी लागतेय असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

मोठी बातमी - कोरोनामुळे चीनच्या वाहन कंपनीचा भारतातील प्रवेश रोखला 

हा विचारसरणीचा डोलारा सांभाळताना आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावरून मतभेत होण्याची शक्यता आहे. हा मतभेद येत्या काळात समोर येताना दिसला तर त्याला कारण असेल हे ट्विट. 

मोठी बातमी -  'आई अंकल येईल..'; आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

हे ट्विट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी. या ट्विटच्या मध्यातून त्यांनी थेट शिवसेनेच्या अत्यंत जवळच्या विषयात हात घातलाय. यामध्ये अमोल यांनी शिवसेनेने तिथीचा हट्ट सोडून, १९ फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख म्हणून जाहीर केली जावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलंय.  शिवसेना कायमच तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आली आहे. भाजपसोबत सत्तेत असताना देखील शिवसेनेने तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा आग्रह धरला होता.  

मोठी बातमी - ...आणि समोरून धडधडत आला मृत्यू, बातमी वाचाल तर डोळ्यातून पाणी येईल

शिवसेनेच्या विचारसरणीप्रमाणे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्याकाळी इंग्रजी पद्धतीने कालगणना देखील होत नसे. त्यामुळे महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणेच साजरी व्हावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. दरम्यान आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेच्या या मागणीवर शिवसेना कसं रिऍक्ट करतेय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. 

amol mitkari to uddhav thackery about chatrapati shivaji maharaj jayanti

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amol mitkari to uddhav thackery about chatrapati shivaji maharaj jayanti