esakal | बापरे! मुंबईत 'हे' आहे प्रदुषणाचं मुख्य केंद्र; पश्चिम उपनगरं आहेत सर्वाधिक प्रदूषित..
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai blue sky

मुंबईची पश्चिम उपनगरे सर्वात प्रदुषित असून वांद्रे कुर्ला संकुल हे मुंबईच्या प्रदुषणाचे केंद्र आहे.जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात बीकेसीतील हवा अतिशय वाईट होती. मात्र,लॉकडाऊन नंतर बीकेसीतील प्रदुषण एप्रिल महिन्यात 4 ते 5 पटीने कमी झाले आहे.

बापरे! मुंबईत 'हे' आहे प्रदुषणाचं मुख्य केंद्र; पश्चिम उपनगरं आहेत सर्वाधिक प्रदूषित..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईची पश्चिम उपनगरे सर्वात प्रदुषित असून वांद्रे कुर्ला संकुल हे मुंबईच्या प्रदुषणाचे केंद्र आहे.जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात बीकेसीतील हवा अतिशय वाईट होती. मात्र,लॉकडाऊन नंतर बीकेसीतील प्रदुषण एप्रिल महिन्यात 4 ते 5 पटीने कमी झाले आहे.

बीकेसीच्या जंक्शनवर नेहमीच वाहानांची वर्दळ असते. तसेच या परीसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. त्यामुळे हा परीसर नेहमीत सर्वात प्रदुषित असतो. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात वांद्रे कुर्ला संकुलातील हवेतील तरंगत्या धुलीकणांचे प्रमाण 300 एककापेक्षा जास्त होते. तर एप्रिल महिन्यात हे प्रमाण 64 एककांपर्यंत खाली आले होते.

हेही वाचा : INSIDE STORY : 'ती' सात ७ बेटं, ज्यांना आपण आज मुंबई म्हणतो...

सफर मुंबई प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील 9 ठिकाणच्या प्रदुषणाची पातळी नोंदवली जाते. यात वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात अंधेरी मालाड या परीसरातील हवा अतिशय वाईट होती.

या ठिकाणी नोंदवली जाते प्रदुषण पातळी: 

-- चेंबूर
-- भांडूप
-- बीकेसी
-- कुलाबा
-- अंधेरी
-- मालाड
-- माझगाव 
-- वरळी
-- बोरीवली 

-- जानेवारीत या ठिकाणी होती अतिशय वाईट हवा: (तरंगते धुलिकण पीएम 2.5 प्रत्येक घनमिटर हवेत मायक्रोग्राम)

बीकेसी -- 311, अंधेरी -- 302, मालाड -- 305, बोरीवली -- 311

-- फेब्रुवारीत या ठिकाणी होती अतिशय वाईट हवा:

बीकेसी -- 331, अंधेरी -- 301, मालाड -- 308, माझगाव -- 306 

-- मार्चमध्ये या ठिकाणी होती अतिशय वाईट हवा:

माझगाव -- 325, मालाड -- 316, अंधेरी -- 310, बीकेसी -- 304 

हेही वाचा: लॉकडाऊनचा गणेशोत्सवाला फटका; मूर्ती घडवण्यासाठीही कामगार मिळेना

-- एप्रिलमध्ये या ठिकाणी होती अतिशय वाईट हवा:

बीकेसी -- 64, अंधेरी -- 89, मालाड -- 108, बोरीवली -- 115, माझगाव -- 78 

-- मे महिन्यात हवेचा दर्जा सुधारला:  

अंधेरी -- 157, मालाड -- 120, माझगाव -- 78, बोरीवली -- 135 

amount of pollution in first five months read full story 

loading image
go to top