मोठी बातमी : ठाणे मनपाच्या निशाण्यावर Axis Bank; पगारखातं बदललं..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

ठाणे, शिवसेनाचा बालेकिल्ला. शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतलेला कोणताही निर्णय म्हणजे ठाण्यातील शिवसैनिकांसाठी पडत्या फळाची आज्ञा. याचीच प्रचीती आता येताना पाहायला मिळतेय. गेले काही दिवस आपण अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना वाद टोकाला गेलेला पाहतोय. दोघांमधील ट्विटर वाॅर देखील आपण पाहिलं. 

ठाणे, शिवसेनाचा बालेकिल्ला. शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतलेला कोणताही निर्णय म्हणजे ठाण्यातील शिवसैनिकांसाठी पडत्या फळाची आज्ञा. याचीच प्रचीती आता येताना पाहायला मिळतेय. गेले काही दिवस आपण अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना वाद टोकाला गेलेला पाहतोय. दोघांमधील ट्विटर वाॅर देखील आपण पाहिलं. 

या नंतर आज ठाण्यातून मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. ठाणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे बँक खाती एक्सिस बँकेतून इतर बँकांमध्ये वळवण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे महानगर पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांची बँक खाती इतर बँकांमध्ये हलवण्यात आल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलंय. 

मोठी बातमी : स्वतःच जेट विमान असणाऱ्या माधुरीने विकला 'तो' बंगला  

ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी आजच हा निर्णय घेतलाय. याबाबत नरेश म्हस्के यांनी अनेक खाते धारकांशी चर्चा केली आणि ताबडतोब हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय.  

सध्या एक्सिस बँकेत ठाणे महानगर पालिकेत काम करणाऱ्या अनेकांची खाती आहेत. या बँकेत कर किंवा पगाराच्या माध्यमातून अनेक पैशांची उलाढाल होत असते. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेने घेतलेला हा निर्णय एक्सिस बँकेसाठी अत्यंत मोठा मनाला जातोय 

मोठी बातमी :  देशात दिवसाला 124 तर मुंबईत दररोज दोघांचा बळी घेतोय हा आजार

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक दणका देणार आहेत. राज्यातील पोलिसांच्या पगाराची ऍक्‍सिस बॅंकेतील खाती रद्द करून ती राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे सोपवली जाणार आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्रातील या बॅंकेला वापरावयास मिळणारा तब्बल 11 हजार कोटींचा निधी बंद होणार आहेत. 

WebTitle : amruta fadanavis shivsena and axix bank issue TMC to shift employees salary accounts to other banks


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amruta fadanavis shivsena and axix bank issue TMC to shift employees salary accounts to other banks