esakal | 'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात...

'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता पालटली आणि महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडावा लागला. मागच्या डिसेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष बांगला सोडला. मात्र बंगला सोडल्यानंतर  वादाला तोंड फुटलं. त्याचं कारण म्हणजे वर्षा बंगल्याच्या भिंतींवर उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिण्यात आलेला मजकूर. हा मजकूर कोणी लिहिला? हा प्रश्न आतापर्यंत अनुत्तरीतच होता. मात्र आता यावर अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. 

हेही वाचा: मुंबईत भूखंड खरेदी करताय? ही आहेत नवी धोरणं.... 

वर्षा बंगल्याच्या भिंतींवर 'भाजप रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ असं लिहिण्यात आलं होतं. तसंच उद्धव ठाकरेंच्या नावातले अद्याक्षरं लिहून काही अपशब्द लिहिण्यात आले होते. अशा प्रकारचा मजकूर समोर आल्यानंतर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरातून टीका झाली होती. मात्र याच्याशी आपला काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलं होतं. मात्र आता यावर अमृता फडणवीस यांनी बाजू मांडली आहे. 

#coronavirus: घरच्या घरी 'असं' बनवा हँड सॅनेटाईझर....  

काय म्हणाल्या अमृता फडणवीस:

“जेव्हा आम्ही वर्षा बंगला रिकामा केला तेव्हा सगळं काही तपासलं होतं. भिंतीवर कधी कधी रेघोट्या ओढायची लहान मुलांना सवय असते. आमच्या मुलीच्या बऱ्याच मैत्रिणी घरी यायच्या. आम्ही बंगला सोडताना सगळ्या रूम तपासल्या तेव्हा तिथे काहीच नव्हतं. बंगल्याच्या खालच्या भागात कर्मचाऱ्यांच्या खोल्या आहेत. तिथे काही असल्यास मला त्याचा अंदाज नाही. हा मजकूर आमच्या मुलीनं लिहिलेला नाही. आम्ही तिला याबद्दल विचारणा केली होती. आम्ही बंगला सोडून गेल्यानंतर तिथे हा मजकूर लिहिण्यात आला असावा." असं स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिलंय. तसंच " या प्रकरणात राजकारण करण्याची काहीही गरज नव्हती" असंही अमृता फडणवीस यांनी म्हंटलंय.  

Amruta fadanvis gave explanation about Who wrote quotes against uddhav thackeray on varsha bungalows walls    

loading image