#Coronavirus: घरच्या घरी 'असं' बनवा हँड सॅनेटाईझर ... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 मार्च 2020

मुंबई: जगभरात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. भारतात आता कोरोना व्हायरसचे ३१ रुग्ण सापडले आहेत. वेळोवेळी निरनिराळ्या लोकांकडून आणि प्रशासनाकडून योग्य ते उपाय करण्याचं आवाहन केलं जात आहे. यात हात स्वच्छ धुणे,सॅनेटाईझरचा वापर करणे असे काही उपाय सांगण्यात येत आहेत. 

हेही वाचा: त्या महिलेनं नाही त्या ठिकाणी लपवले 'ड्रग्स' आणि पोलिसांनी मारला.... 

कुठेही बाहेर गेल्यावर हँड सॅनेटाईझरचा उपयोग करा असं आवाहन केलं जात आहे. मात्र बाजारात विकलं जाणारं हँड सॅनेटाईझर अतिशय महाग आहे. सर्वसामान्य लोकांना हे परवडणारं नाहीये. तसंच बाजारातल्या सॅनेटाईझरमध्ये रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.  मात्र आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला घरच्या घरी हँड सॅनेटाईझर कसं तयार करायचं हे सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्या घरच्या काही गोष्टींचा उपयोग करून तुम्ही हँड सॅनेटाईझर बनवू शकणार आहात. 

या गोष्टी महत्वाच्या :

  • ऍलोव्हेरा जेल
  • गुलाब पाणी 
  • टी ट्री ऑईल -- ५ थेंब 
  • लॅव्हेंडर ऑईल -- ६-७ थेंब 
  • स्क्वीझ बॉटल 

हेही वाचा: मुलांच्या दाढीबद्दल 'ही' आहे मुलींची चॉईस; आधी वाचा,मग थँक्यू बोला !

असं तयार करा सॅनेटाईझर:

  • एका स्क्वीझ बॉटलमध्ये ऍलोव्हेरा जेल घ्या. 
  • त्यात गुलाब पाणी टाका. 
  • नंतर त्यात ५ थेंब टी ट्री ऑईल टाका. यामुळे बॅक्टेरिया तुमच्यापासून दूर राहतील. 
  • त्यानंतर या मिश्रणात ६-७ थेंब लॅव्हेंडर ऑईल टाका. 
  • त्यानंतर बॉटल बंद करा आणि चांगल्या पद्धतीनं मिश्रणाला मिसळून घ्या. 

अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हँड सॅनेटाईझर तयार करू शकता. 
   
विशेष म्हणजे हे होममेड सॅनेटाईझर तुही अवघ्या २-३ मिनिटमध्ये बनवू शकणार आहात. यामुळे तुमचे हात सॉफ्ट राहणारच आहेत त्यासोबत तुमचं कोरोनापासूनही संरक्षण होणार आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How you can make Hand Sanitizer at home read full process