
मुंबई : उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली होती. यावर नंतर फडणवीसांनी प्रतिक्रियाही पण आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर यावरुन निशाणा साधला आहे. (Amruta Fadnavis reacts to harsh criticism of Devendra Fadnavis by Uddhav Thackeray)
"उद्धव ठाकरे हे प्रत्येक बाबतीत कुरकुर, टूरटूर करत असतात. त्याच्यावर मी काही जास्त बोलू शकत नाही. पण फडणवीसांना कुणी मागे ढकललं तर ते पुन्हा उभारी घेतात" अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील नेस्को सभागृहात दोन दिवसांपुर्वी शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तुफान हल्ला चढवला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक असेल असा दावाही त्यांनी केला होता.
दरम्यान, "कालच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांचं नैराश्य दिसलं. त्यांनी त्यांच्या भाषणात आमच्यावर टीका केली पण ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावेळी तुम्ही का राजीनामे दिले नाहीत? मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो तकदीर मे लिखा होता है... मागच्या अडीच वर्षे महाविकास आघाडीने मला संपवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मला संपवू शकत नाहीत" अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.