फ्लॅट दाखवण्याच्या नावाने अमृता घेऊन जायची आणि ..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

अमृता ठक्कर असं महिलेचं नाव.. 

नवी मुंबई : भिवंडी येथील कशेळी भागात स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका महिलेने कोपरखैरणे भागात राहणाऱ्या व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमृता ठक्कर असे महिलेचे नाव असून, तिने या व्यक्तीकडून सहा लाख 67 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोपरखैरणे पोलिसांनी तिच्याविरोधात फसवणुकीसह मोफा कलमान्वये गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.

आणखी वाचा : आता मुंबईच्या समुद्रकिनारी बिनधास्त करा, कुणालाही घाबरायचं कारण नाही..

आधी पैसे घेतले आणि दिलं कर्ज मिळवून देण्याचं आश्वासन : 

फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष पवार (42) असून, तो कुटुंबासह कोपरखैरणे सेक्‍टर-3 भागात राहावयास आहे. संतोषला अमृता ठक्करने कशेळी येथील वन बीएचके फ्लॅट दाखवून तो 15 लाख 20 हजार रुपयांमध्ये विकत देण्याचे कबूल केले. त्यानंतर अमृताने संतोषकडे सहा लाख रुपये रोख रकमेची मागणी करून उर्वरित रकमेचे एलआयसीकडून कर्ज मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे संतोषने पत्नीचे दागिने गहाण ठेवून व इतर माध्यमातून जमवलेली सहा लाख रुपयांची रोख रक्कम अमृताला दिली.

हा नवीन ट्रेंडलग्न समारंभात हवेत महागडे दागिने! आता चिंता सोडा...

नंतर समजल  फ्लॅटत तर दुसऱ्यालाच विकलाय :

त्यानंतर तिने फ्लॅटची नोंदणी करण्याच्या बहाण्याने संतोषला ठाण्यात बोलावून त्याचा विश्‍वास संपादन केला; मात्र नोंदणी झालेल्या कागदपत्रांची संतोषने पडताळणी केली असता ते लिव्ह ऍण्ड लायसन्सची कागदपत्रे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संतोषने थेट कशेळी येथील पद्मावती बिल्डरच्या कार्यालयात जाऊन त्याने नोंदणी केलेल्या फ्लॅटबाबत विचारणा केली; मात्र हा फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे त्याला समजले. संतोषने याबाबत अमृताकडे विचारणा केल्यानंतर तिने जमीन मालकाने हा फ्लॅट परस्पर विकल्याचे सांगून आपले हात झटकले.

आणखी वाचा : अकराशे रुपये आणि पाच वर्ष तुरुंगवास

मग पैशाचं काय झालं ? 

त्यामुळे संतोषने तिच्याकडे आपल्या पैशांची मागणी केल्यानंतर अमृताने पाच लाख 90 हजारांचा चेक त्याला दिला; मात्र तो वठला नाही. अमृताने संतोषला पैसे परत केले नाहीत. याउलट तिने ठाणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीमध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे आश्‍वासन देऊन संतोषकडून आणखी 67 हजार रुपये उकळले; मात्र त्यानंतरदेखील अमृता हिने संतोषला ना फ्लॅट दिला, ना त्याचे पैसे परत केले. त्यामुळे संतोषने अखेर कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. 

WebTitle : amruta used to call the client for showing the flat and then she 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amruta used to call the client for showing the flat and then she