मुंबई हादरली! बॉयफ्रेंडसोबतच्या अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलीने बापालाच संपवले, भावालाही जबर मारहाण
Daughter Kills Father : कांबळे हे त्यांच्या मुलीच्या संबंधांवर नाराज होते आणि वारंवार विरोध करत होते. याच वादातून रागाच्या भरात सोनालीने प्रियकर महेशच्या मदतीने हे अत्यंत अमानुष कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी (Andheri MIDC) परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आलीये. वडिलांनी तिच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.