

Gokhale Bridge Accident
ESakal
मुंबई : मुंबईत अंधेरी येथील गोखले पुलावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन चारचाकी वाहनांनी एकमेकांना धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.