esakal | अंधेरी : महिलेची फसवणूक करणाऱ्यास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अंधेरी : महिलेची फसवणूक करणाऱ्यास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : फ्लॅट विक्रीच्या नावाने एका महिलेची सुमारे अकरा लाख रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. नदीम अहमद जमील अहमद शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी हिंदू असून वारकऱ्यांची परंपरा खंडीत केली

शबाना माझीझुल रेहमान अन्सारी ही महिला इमामवाडा परिसरात राहते. तिचे आई-वडील वयोवृद्ध असल्याने त्यांच्यासाठी तिला एक फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. तिघांनी तिला जोगेश्‍वरीतील एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून त्यांनी तिचा विश्‍वास संपादन करून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तिने ओशिवरा पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणात एका आरोपीला याआधी अटक करण्यात आली होती.

loading image
go to top