मुंबई : अंधेरीत कोविडचा विळखा कायम सर्वाधिक इमारती आणि मजले सील

सुरुवातही अंधेरीतून झाली आणि अजूनही सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत आहे.
Mumbai
Mumbaisakal

मुंबई :  मुंबईत कोविड रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली असली तरी अजूनही काही भाग कोविडच्या विळख्यात आहेत, त्यापैकी एक अंधेरी पश्चिम विभाग आहे. कोविडच्या सुरुवातीपासून ते  आतापर्यंत अंधेरीचे रहिवासी कोविडशी झुंज देत आहेत. सध्याही इतर वॉर्डांच्या तुलनेत सर्वाधिक इमारती आणि मजले या विभागात सीलबंद आहेत. अंधेरी पश्चिम आणि पूर्व भागात राहणाऱ्या लोकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतील कोरोनाची सुरुवातही अंधेरीतून झाली आणि अजूनही सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सध्या 8 इमारती आणि 220 मजले सील करण्यात आले आहेत. सध्या, सर्वाधिक 393 सक्रिय रुग्ण अंधेरी (पश्चिम) मध्ये आहेत. दरम्यान, अंधेरीमध्येच रुग्ण जास्त का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे?

यावर महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व किंवा पश्चिम या दोन्ही वॉर्डांमध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीपासून आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्याही जास्त आहे. ज्या वॉर्डात जास्त केसेस येतात त्या वॉर्डांना आम्ही अलर्ट पाठवतो. शहरातील रुग्ण कमी असले तरी आम्ही सर्व वॉर्डांवर लक्ष ठेवून आहोत.

Mumbai
ED काय, ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही; NCP आमदाराचा थेट इशारा

उपनगर कोरोनाचा बालेकिल्ला -

कोविडच्या आकड्यांवर नजर टाकली तर उपनगराकडे साथीचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते. उपनगरातील 5 वॉर्डांमध्ये कोविडचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, अंधेरी (पश्चिम) 57802, बोरिवली पश्चिम 53479, अंधेरी (पूर्व) 48320, दहिसर 47515 आणि मालाड 46025 कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे.

नवीन रुग्णांमध्ये 7% आणि मृत्यूंमध्ये 22% घट

मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत 12252 नवीन कोविड रुग्ण आढळले, तर ऑक्टोबरमध्ये 11302 नवीन रुग्ण आढळले. म्हणजेच एका महिन्यात नवीन प्रकरणांमध्ये 7 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये 141 मृत्यू झाले होते, तर ऑक्टोबरमध्ये 109 मृत्यूंची नोंद झाली होती, म्हणजेच मृतांच्या संख्येत 22 टक्क्यांनी घट झाली आहे.

Mumbai
'आम्ही जिंकलो', पाकिस्तानसाठी स्टेटस ठेवणं शिक्षिकेला पडलं महाग

मुंबईची आकडेवारी

एकूण चाचण्या-114,53,131

एकूण पॉझिटिव्ह केसेस- 755947 एकूण मृत्यू - 16247

पूर्णपणे बरा - 733318

दुप्पट दर - 1567 दिवस

चाळ/झोपडपट्टी सील- 0

इमारत सील- 35

राज्य आकडेवारी एकूण चाचण्या - 6,26,67,211 एकूण पॉझिटिव्ह केसेस- 66,11,078 एकूण मृत्यू - 140216 एकूण बरे - 64,50,585

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com