अंधेरी रेल्वे स्थानकात क्रिकेटपटूचा "कार'नामा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

फलाटावर मोटार आणल्याने अटक
मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानक. फलाट क्रमांक 1. सकाळचे सव्वासात वाजलेले. फलाटावर बऱ्यापैकी वर्दळ. प्रत्येक जण नेहमीच्या गाडीची वाट पाहतोय. इतक्‍यात एक कार थेट फलाटावरच घुसते.

प्रवाशांची एकच पळापळ. कारचे ब्रेक करकचून लागल्याचा आवाज. प्रवाशांच्या छातीत धडकी. पोलिस धावत येतात. कारचालकाला ताब्यात घेतात...

भल्या सकाळी घडलेल्या या थरारनाट्याने रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. हा "कार'नामा करणाऱ्या तरुणाचे नाव आहे हरमित जसबीर सिंग. तो क्रिकेटर आहे. तो 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघातून खेळला होता. हरमितने कारवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अपघात टळला. आरपीएफच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी झाली. तो मालाड येथे नेट प्रॅक्‍टिससाठी जात होता. "आपण रस्ता चुकलो आणि कार फलाटावर आणली', अशी कबुली त्याने दिली.

त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. अशा प्रकारची तीन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. सहा महिन्यांपूर्वीही एका चालकाने अंधेरी रेल्वे स्थानकात कार घुसवली होती.

Web Title: Andheri Railway Station cricketer car in