
मुंबईत सुरू असलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. विशेषतः पश्चिम उपनगरातील अंधेरी सब वे मध्ये तब्बल पाच फुटांपर्यंत पाणी साचल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी मुंबई वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ सब वे वाहतुकीसाठी बंद केला आहे.