esakal | अंधेरीला लस साठवणूक केंद्र, पालिकेचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
अंधेरीला लस साठवणूक केंद्र, पालिकेचा निर्णय
sakal_logo
By
समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड विरोधातील लसींचा तुटवडा असल्याने 1 मे पासून आवश्‍यक प्रमाणात लस मिळाली तरच 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होणार असल्याची भूमिका महानगर पालिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र लसीकरणासाठी प्रत्येक नगरसेवक प्रभागात 1 या प्रकारे 227 लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आदेश महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले.

1 मे पासून मुंबईतील 90 लाख नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. मात्र यासाठी आवश्‍यक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. अवघ्या तीन दिवसात किती लसींचा साठा उपलब्ध होईल यावर 1 मे पासूनच्या लसीकरणाचा निर्णय होणार आहे. आवश्‍यक साठा असेल तरच हे लसीकरण सुरु करता येईल अशी भूमिका महानगर पालिका प्रशासनाने घेतली आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूदर वाढताच

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 1 मे पासून होणाऱ्या लसीकरणाचा आढावा घेतला.मयात,मुंबईत 227 लसीकरण केंद्र तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. आरोग्य केंद्र प्रमाण मानून हे लसीकरण केंद्र सुरु करावेत. यासाठी पुरेशी जागा आवश्‍यक साधने उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे लसीकरण केंद्र सुरु करावेत. तसेच महानगर पालिकेच्या दवाखान्यांसह नजीकच्या खासगी रुग्णालयांशी हे केंद्र सलग्न ठेवावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

राज्य सरकारसह महानगर पालिका प्रशासन लस उत्पादन कंपन्यांशी संपर्कात आहे. मुंबईला प्राधान्यांने लससाठा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. लस साठ्याचा ओघ तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर दरररेज किमान 1 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा उद्दिष्ट आहे.

इक्बाल सिंह चहल, आयुक्त मुंबई महानगर पालिका

हेही वाचा: 15 मे पर्यंत मुंबईची परिस्थिती नियंत्रणात?

अंधेरीला लस साठवणूक केंद्र

महानगर पालिकेनं कांजूरमार्ग येथे लस साठवणूक केंद्र तयार केले आहे. येथील साठा पूर्व उपनगरांसाठी वापरण्यात येणार आहे. त्याच बरोबर अंधेरी येथेही प्रादेशिक लस साठवणूक केंद्र सुरु करण्यात येत आहे, असे महानगर पालिकेकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत 26 ते 27 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 1 मे पासून सुरु होणाऱ्या मोहिमेसाठीही पालिकेची तयारी आहे. आठवड्याला 10 लाख नागरिकांचे लसीकरण करता येईल अशी तयारी आहे. तसेच 1 मे पूर्वी रंगीत तालिमही घेण्यात येईल. लस मिळेल तसे लसीकरण करण्याची तयारी पालिकेने केली आहे. 1 मे पासून मोहिम राबविण्यास पासिकेची तयारी आहे. फक्त लस मिळणे गरजेचे आहे.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त मुंबई महापालिका

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

andheri vaccine storage center decision of bombay municipal corporation