अंगारकी संकष्टीला सिद्धिविनायक मंदिरात अशी असेल दर्शनाची व्यवस्था |siddhivinayak temple | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddhivinayak Tempal

अंगारकीला सिद्धिविनायक मंदिरात अशी असेल दर्शनाची व्यवस्था

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: प्रभादेवी (Prabhadevi) येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak temple) कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी अंगारकीच्या निमित्ताने (Angaraki sankashti chaturthi) सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने प्रभादेवी येथील मंदिरात येतात. उद्या अंगारकी संकष्टी आहे. या निमित्ताने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात गर्दी (Crowd) होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील मंदिरांमध्ये ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उद्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाची कशी व्यवस्था असेल ते समजून घ्या.

मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारक संकष्टी असल्यामुळे मध्यरात्री ०१:३० वा. ते ०३:०० दरम्यान श्रींच्या दर्शनासाठी मंदिर सुरू असणार आहे तसेच मंगळवार पहाटे ०३:०० वा. ते ०४:०० दरम्यान मंदिर मंगल आरतीसाठी बंद ठेवण्यात येईल.

हेही वाचा: आत्मनिर्भर भारत: आपणही बनवणार रडारला न सापडणारं फायटर विमान

त्यानंतर मंदिर पहाटे ०४ : ०० ते दुपारी १२ : ० पर्यंत भाविकांसाठी खुले राहील. १२:०० वा. ते १२:३० वा मंदिर श्रींच्या नैवेद्यासाठी बंद राहील. दुपारी १२:३० वा सायंकाळी ०७ :०० वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहील.

सायंकाळी ०७:०० ते रात्रौ ०८:३० वाजेपर्यंत भाविकांसाठी दुरुन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रौ ०८ : ०० ते रात्रौ ०९: ३० वाजेपर्यंत श्रींची महापूजा,नैवद्य व महाआरती होणार आहे. रात्रौ शेजारती नंतर भाविकांसाठी मंदिर बंद करण्यात येईल.

loading image
go to top