घृणास्पद ! कोरोनाच्या रागापायी दुचाकीवरुन आलेला 'तो' माथेफिरु मणिपुरी मुलीवर थुंकून पसार

घृणास्पद ! कोरोनाच्या रागापायी दुचाकीवरुन आलेला 'तो' माथेफिरु मणिपुरी मुलीवर थुंकून पसार

मुंबई - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असुन, हा कोरोना चीनी नागरीकांमुळे आल्याचा समज करीत शहरात चीनी नागरीक म्हणून मणुपुरी नागरीकांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार सांताक्रुझ येथील कलिना परिसरात घडला असुन, एक मणिपुरी मुलीवर दुचाकीवरून आलेल्या माथेफिरुने थुंकण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. दुचाकीवरुन आलेला तो माथेफिरु मणिपुरी मुलीवर थुंकून तिथून पसार झाला. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात त्या माथेफिरु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्या मणिपुरी मुलीच्या मदतीने घटनेच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासत आहे.

सध्या जगभरात कोरोना यारोगाचे थैमान घातले आहे. हा विषाणू चीन देशातून इतरत्र पसरला आहे. त्यामुळे लोकांमध्ये चीनबाबत प्रचंड संताप आहे. काहींनी तर अनेकदा आपला राग समाज  माध्यमातून व्यक्तही केला आहे. मात्र आपल्याच देशातील मणिपूर राज्यातील मुलीला चीनी नागरीक समजुन अशा पकारे कृत्य केल्याने याचा सर्व स्तरांतुन निषेध होत आहे.

शोन्यो कबाई असं संबंधित तरुणीचं नाव असून ती तिच्या बहिणीसोबत अन्नधान्य खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार त्यांच्या जवळ आला. त्यानं जबरदस्तीनं तिचा मास्क काढला आणि तो तिच्यावर थुंकला. कलिना सिग्नलजवळ हा प्रकार घडला.

रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यानं बहिणींना कोणाचीही मदत घेता आली नाही. 'मी मास्क आणि टोपी घातली होती. त्यामुळे त्या दुचाकीस्वाराला नेमका कोणत्या गोष्टीचा इतका राग आला याची मला कल्पना नाही,' असं कबाई यांनी म्हटलं. या घटनेचा कोरोनाशी काही संबंध आहे की नाही, हे मला माहीत नाही. मात्र आमच्या समुदायाला सापत्नपणाची वागणूक मिळते, अशी व्यथा कबाई यांनी मांडली.

दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या लिंडा नेवमाई यांनी ट्विटमधून या घटनेची माहिती दिली. 'मणीपूरची एक तरुणी नवी पीडिता ठरली आहे. अशा प्रकारचा वंशभेद थांबायला हवा. आपण कोरोनाचा सामना करायचा की वंशवादाचा? या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मी विनंती करते,' असं नेवमाईंनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

angry bike rider did unethical act on the street of mumbai after seeing manipuri girl during lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com