देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यात 'तीन' मागण्या, म्हणालेत मंत्रिमंडळ बैठकीत 'हे' निर्णय घ्या

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यात 'तीन' मागण्या, म्हणालेत मंत्रिमंडळ बैठकीत 'हे' निर्णय घ्या

मुंबई - महाराष्ट्र राज्याची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडतेय. १७ मार्चनंतर पहिल्यांदाच आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडतेय. या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र एक लिहिलंय. या पत्रामार्फत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 'हे' तीन निर्णय घ्यावेत अशी मागणी फडणवीसांनी केलीये केलीये.    

मागणी १ : 

केंद्र सरकारने नागरिकांना ३ महिन्यांचं रेशन पुरवण्यात यावं असे निर्देश राज्यांना दिले आहेत. मात्र महाराष्ट्रात ते दिलं जात नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विरोधी पक्षाकडून याबाबत वारंवार विचारणा केली जातेय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला त्वरित ३ महिन्यांचं रेशनवरील धान्य देण्याची मागणी फडणवीसांनी केलीये. 

मागणी २ 

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच लॉकडाऊन काळातील आरोग्य व्यवस्थेवर आणखी गांभीर्याने चिंतन करण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. जे फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स म्हणजेच कोरोना बाधितांच्या संपर्कातील आणि त्यांच्यावर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी आहेत, या सर्वांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या सुरक्षा उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना  कोरोनाची लागण होतेय. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी लागणारे PPE किट्स किंवा या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज असल्याची फडणवीस म्हणालेत

मागणी ३ 

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये घेण्यात आलेल्या तबलिकींच्या मरकज कार्यक्रमातून अनेकजण महाराष्ट्रात आलेत. अशात अनेकजण अजूनही बेपता आहेत. अशा बेपत्ता तबलिकींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वारंवार विरोधी पक्षाकडून करण्यात येतेय. कारण सरकारकडून वारंवार सांगूनही असे नागरिक स्वतःहून बाहेर येत नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.   

१७ मार्चनंतर पहिल्यांदाच आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक

महाराष्ट्र राज्याची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडतेय. १७ मार्चनंतर पहिल्यांदाच आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडतेय. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळाची बैठक पडतेय. या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची कोरोना परिस्थिती, राज्यातील अन्नसाठ्याबद्दल चर्चा, महाराष्ट्रात येत्या काळात येऊ घातलेलं आर्थिक संकट आणि १४ एप्रिलनंतर महाराष्ट्रात कशा प्रकारे कोरोना लॉकडाऊन उठवायचा याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय. मंत्रालयातून उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे , जयंत पाटील, राजेश टोपे यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला तर जे मंत्री मुंबई बाहेर आहेत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग नोंदवलाय.

ex cm fadanavis writes letter to cm uddhav thackeray and demands three decisions

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com