अनिल अंबानी यांच्यावर कुणी ठोकलाय 48 अब्जांचा दावा?

अनिल अंबानी यांच्यावर कुणी ठोकलाय 48 अब्जांचा दावा?

मुंबई : अनिल अंबानी यांच्याविरोधात चीनमधील तीन बँकांनी लंडनमधील कोर्टात याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (IECBC), चायना डेव्हलपमेंट बँक आणि   एक्सपोर्ट-इंपोर्ट बैंक ऑफ चायना यांनी अनिल अंबानी यांच्यावर यांच्यावर कर्जबुडवेगिरीचे आरोप लावलेत. 

या बँकांनी अनिल अंबानी यांना खासगी हमीवर रिलायन्स कम्युनिकेशन (RCom) या कंपनीला 2012 मध्ये 92.52 करोड डॉलर्सचं कर्ज दिलं होतं. फेब्रुवारी 2017 मध्ये आर कॉमला कर्ज चुकवल्याने डिफॉल्टर म्हणून घोषित केलं होतं. आता यातील 68 करोड डॉलर्स म्हणजेच 4847 करोड रुपये अजूनही थकीत आहेत. 

IECBC अंबानी आणि कर्जधारक यांच्यातील फरक समजू शकलेला नाही. असं अनिल अंबानी यांचे वकील म्हणतायत. अनिल अंबानी यांचे वकील रॉबर्ट हॉव यांनी अनिल अंबानी यांनी कधीही खासगी तारण हमी दिली नव्हती असं स्पष्ट केलंय. त्याऐवजी बिनशर्त कम्फर्ट लेटर देण्याचे मान्य केलं असल्याचं देखील ते शोधतायत.   

मिडिया रिपोर्ट्सनुसार अनिल अंबानी हे 2011 मध्ये बीजिंगला गेले होते. त्यांनी  IECBC चे माजी चेअरमन जिआंग जिआनक्विंग यांच्याशी बातचीत झाल्याचं सांगतात. या बाबतीत  IECBC चे वकील बंकिम थांकी यांनी अनिल अंबानी याच्यातर्फे  हसित शुक्ला यांनी खासगी तारण कागदपत्रांवर सह्या केल्याचं सांगितलं आहे. मात्र अंबानी यांच्या वकिलांकडून  हसित शुक्ला यांना अश्याप्रकारच्या सह्या करण्याची अनुमती नसल्याचं सांगितलं जातंय.

या बाबतीत आता IECBCच्या वकिलांकडून लवकरात लवकर निर्णय देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

कम्फर्ट लेटर म्हणजे काय रे भाऊ ? 

कम्फर्ट लेटर म्हणजे एक प्रकारची हमी असते. यामध्ये कर्ज घेणारा आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडेल अशी हमी देतो. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारची कायदेशीर बंधनं नसतात.  

WebTitle :  Anil Ambani dragged to court for $680 million unpaid loan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com