अनिल देशमुखांनी PMLA कोर्टात स्वतः मांडली बाजू; उपचारांबाबत केली महत्वाची मागणी

आपल्या प्रकृतीबाबत त्यांनी कोर्टाला माहिती दिली.
Anil Deshmukh suddenly fainted in arthur road jail today admitted in J J Hospital mumbai
Anil Deshmukh suddenly fainted in arthur road jail today admitted in J J Hospital mumbai Anil Deshmukh rushed to Mumbai court for surgery

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात केला स्वतः युक्तिवाद केला. युक्तीवादादरम्यान त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत कोर्टाला माहिती दिली. तसेच आपल्याला खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी द्यावी, अशी मागणीही केली. (Anil Deshmukh argument in PMLA court an important demand for treatment)

Anil Deshmukh suddenly fainted in arthur road jail today admitted in J J Hospital mumbai
Youtubersसाठी हब बनलं 'हे' गाव; ग्रामस्थ जगण्यासाठी करताहेत कंटेन्ट निर्मिती

देशमुख युक्तीवाद करताना म्हणाले, "मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो. माझी प्रकृती ठीक नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी परवानगी देण्यात यावी". त्यांच्या या मागणीवर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी अनिल देशमुख यांना कोर्टात लेखी अर्ज सादर करा. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावतीनं लेखी अर्ज सादर करण्यात आला. या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Anil Deshmukh suddenly fainted in arthur road jail today admitted in J J Hospital mumbai
KRK : अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

यापूर्वी देखील अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मिळावी याकरिता अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराची परवानगी नाकारत जे. जे. रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com