esakal | अनिल देशमुखांचा पाय खोलात? मुलांच्या कंपन्यांवर CBIची नजर

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

शेल कंपन्यांच्या हॉटस्पॉटद्वारे कंपनीचे व्यवहार होत असल्याची शंका

अनिल देशमुखांचा पाय खोलात? मुलांच्या कंपन्यांवर CBIची नजर
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी खंडणी वसूल केल्याचे आरोप पत्राद्वारे केले होते. या पत्रानंतर उच्च न्यायालयाने (Bombay High Court) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश CBI ला दिले. त्यामुळे अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. काही दिवसांपूर्वी CBIने अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या काही मालमत्तांवर छापेमारी केली. या छापेमारीबाबत विस्तृत माहिती देण्यात आली नाही. मात्र सध्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा पाय आणखी खोलात जात असल्याची चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्या मुलांच्या मालकीच्या असलेल्या ६ कंपन्यांच्या व्यवहारांवर CBIची करडी नजर असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (Anil Deshmukh in Danger as 6 firms owned by his sons are under CBI lens)

हेही वाचा: अनिल देशमुख ही मोगलाई नाही - जयश्री पाटील

अनिल देशमुखांच्या मुलांच्या मालकीच्या असलेल्या ६ कंपन्यांपैकी कोलकातास्थित एका कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर CBI विशेष लक्ष ठेवून आहे. कोलकातास्थित कंपनींचे व्यवहार हे शेल कंपन्यांच्या व्यवहाराशी संबंधित हॉटस्पॉटमार्फत केले जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचा प्रयत्न केला का? यासंबंधीचा तपास CBI सध्या करत आहे. त्याशिवाय, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये काही काळंबेरं आहे का? याचाही तपास CBI करत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत असताना अनिल देशमुखांची मुले सलील आणि हृषिकेश देशमुख यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या आर्थिक उलाढालींवर CBIची करडी नजर आहे. त्यातही कोलकातास्थित झोडियॅक डीलकॉम प्रा. लिमिटेड या कंपन्यावर CBIचे विशेष लक्ष आहे, असं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: ...अन् CBI छापेमारीनंतर दौऱ्यावर गेलेले अनिल देशमुख घाईघाईत परतले घरी

सूत्रांच्या माहितीनुसार, झोडियॅक डीलकॉम कंपनीचा पत्ता ९/१२ लाल बाझार, ब्लॉक ई, दुसरा मजला, कोलकाता असा आहे. ही जुन्या काळातील इमारत आहे. सुमारे ४०० शेल कंपन्यांचे व्यवहार या इमारतीच्या हॉटस्पॉटच्या माध्यमातून चालवण्यात येत असल्याची माहिती केंद्र सरकारकडे आहे. २०१७ ला केंद्र सरकारने एक टास्क फोर्स तयार केली होती. त्या टास्क फोर्सने या शेल कंपन्यांचा भांडाफोड केला होता.