राज्य सरकारकडून ST महामंडळाला एक हजार कोटींचे पॅकेज,अनिल परब यांची घोषणा

प्रशांत कांबळे
Tuesday, 10 November 2020

सोमवारी एका महिन्याचे वेतनाची घोषणा केल्यानंतर मंगळवारी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने एसटी महामंडळाला एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याची घोषणा परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी केली आहे.

मुंबई: गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोंडी अखेर फुटली आहे. सोमवारी एका महिन्याचे वेतनाची घोषणा केल्यानंतर मंगळवारी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने एसटी महामंडळाला एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याची घोषणा परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सर्व महिन्याचे वेतन दिवळीपूर्वीच दिले जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्याचे वेतन प्रलंबित होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रोश आंदोलन सुद्धा केले, त्याशिवाय वेतन मिळत नसल्याने 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केली आहे.

अधिक वाचा-  सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; परिवहन मंत्र्यांना अटक करा, भाजप नेत्यांची मागणी

त्यानंतर आता, प्रलंबित तीन महिन्याचे वेतन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने दिलेल्या एक हजार कोटी रुपयांमध्ये दिवळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरीत महिन्याचे वेतन दिले जाणार असल्याची घोषणा सुद्धा परब यांनी केली आहे.

अधिक वाचा-  शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः डॉक्टर, परिचारिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Anil Parab announces Rs 1 thousand crore package for ST Corporation

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Parab announces Rs 1 thousand crore package for ST Corporation