esakal | शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः डॉक्टर, परिचारिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः डॉक्टर, परिचारिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय

शिवडी क्षयरोग रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.ललितकुमार आनंदे यांना पदावरुन बाजूला करण्याबरोबरच 12 परिचारीका आणि 1 डॉक्टराविरोधात चौकशी करुन त्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षा देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.

शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः डॉक्टर, परिचारिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: शिवडी क्षयरोग रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.ललितकुमार आनंदे यांना पदावरुन बाजूला करण्याबरोबरच 12 परिचारीका आणि 1 डॉक्टराविरोधात चौकशी करुन त्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षा देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.

सूर्यभान यादव या 27 वर्षीय तरुण रुग्णांचा मृतदेह क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात 14 दिवस पडून होता. दैनिक सकाळने सर्वप्रथम हा प्रकार उघड केला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी महानगर पालिकेने उप आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने अधिक्षक डॉ.आनंदे यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांवर बेजबदार पणाचा ठपका ठेवला होता. डॉ.आनंदे यांना पदावरुन दूर करण्याची शिफारस केली होती. डॉ.आनंदे यांना पदावरुन दूर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.  

अधिक वाचा- ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा, ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरुन भाजप आक्रमक

या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या 12 परिचारीका आणि 1 डॉक्टरांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. तीन परिचारीका आणि डॉक्टरविरोधात संक्षिप्त स्वरुपाची चौकशी करुन सौम्य स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

अधिक वाचा-  दिवाळी आणि छट पूजेनिमित्त एलटीटी-हटिया दरम्यान अतिरिक्त उत्सव गाड्या

कोविड आणि क्षयाची बाधा झाल्याने सूर्यभान यादव 30 सप्टेंबरला शिवडी क्षयरोग रुग्णालयात दाखल झाला होता. हा तरुण 4 नोव्हेंबरपासून रुग्णालयातून बेपत्ता होता. त्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. 18 नोव्हेंबर रोजी रुग्णालयाच्या शौचालयात या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Sewri Hospital Corpse Case Decision to dismiss doctors and nurses

loading image