esakal | सिंधुदुर्ग उप परिसराला मधू दंडवते यांचे नाव द्या, सिनेट सदस्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai University

सिंधुदुर्ग उप परिसराला मधू दंडवते यांचे नाव द्या, सिनेट सदस्यांची मागणी

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) सिंधुदुर्ग (Sindhudurg) उप परिसराला मधू दंडवते (Madhu Dandawate) यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी युवा सेनेच्या (yuvasena) सिनेट सदस्यांनी केली आहे. या मागणीसाठी आज युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत ,राजन कोळंबेकर आणि शितल देवरुखकर शेठ यांनी कुलगुरू (vice chancellor) प्रा. सुहास पेडणेकर (suhas pednekar) यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कुलगुरु प्रा.रविंद्र कुळकर्णी,कुलसचिव डॉ.बळीराम गायकवाड, अधिष्ठाता डॉ.अजय भांबरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी लादणे थांबवा; मराठी एकीकरण समितीचा निषेध

राजापूर लोकसभा मतदार संघ हा पुर्वाश्रमीचा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मतदार संघ या मतदारसंघाचे सतत पाच वेळा देशाच्या लोकसभेत नेतृत्व केलेले, देशाचे माजी अर्थमंत्री, कोकण रेल्वेचे जनक माजी रेल्वेमंत्री, स्वातंत्रसेनानी, समाजवादी नेतेप्रा. मधु दंडवते यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्याकरिता महत्त्वाचे योगदान दिले असल्यामुळे त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसर केंद्रास देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली.

loading image
go to top