Anil Parab Wins Mumbai Graduate : मुंबई पदवीधरमधून अनिल परब विजयी; ठाकरे गटाचा जल्लोष

त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या उमेदवारानं आघाडी घेतली आहे.
Anil Parab
Anil Parab sakal

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब हे विजयी झाले आहेत. त्यांचा 25 हजार मतांनी विजय झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या उमेदवारानं आघाडी घेतली आहे. तर कोकण पदवीधरमधून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे आघाडीवर आहेत. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Anil Parab
Lonavala Video: लोणावळ्यातील 'त्या' भीषण व्हिडिओची प्रशासनाकडून गंभीर दखल; पर्यटनासाठी जाहीर होणार गाईडलाईन्स

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केलं होतं. यांपैकी 64 हजार 222 मतं वैध ठरली तर 3 हजार 422 मतं अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. अनिल परब हे 44 हजार 784 मतं मिळवून विजयी झाले.

उमेदवारांना मिळालेली मतं पुढीलप्रमाणं

1) अनिल परब (ठाकरे शिवसेना) (44 हजार 784)

2) किरण शेलार (भारतीय जनता पार्टी) (18 हजार 772)

3) योगेश गजभिये (अपक्ष) (89)

4) अरुण बेंडखळे (अपक्ष) (39)

5) उत्तमकुमार साहु (अपक्ष) (11)

6) मुकुंद नाडकर्णी (अपक्ष) (464)

7) रोहण सठोणे (अपक्ष) (26)

8) हत्तरकर सिध्दार्थ (अपक्ष) (37)

पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केलं.

Anil Parab
Sambhaji Bhide: "...तर तुमच्या मिशा कापू"; महिला संघटनेचा संभाजी भिडेंना इशारा

विजयाची अपेक्षा होतीच - अंधारे

अनिल परब यांच्या विजयाची अपेक्षा होती आणि ते विजयी झालेले आहेत. त्यामुळं आम्हा सगळ्यांना शिवसैनिक म्हणून आनंद आहे. कायदेशीर चौकटीत राहून विरोधकांना प्रश्न विचारणारी व्यक्ती सभागृहात हजर असणं गरजेचं असतं त्यानुसार त्यांची पुन्हा सभागृहात एन्ट्री होणार आहे, त्यामुळं आनंद आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com