
Government Help for animals Died in floods
ESakal
मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या दुभत्या जनावरांच्या तुटपुंज्या भरपाईमुळे राज्यातील पशूपालक आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्याच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार, एका दुभत्या गायीसाठी फक्त ३७ हजार ५०० रुपये भरपाई मिळणार आहे, तीही केवळ तीन जनावरांच्या मर्यादेत. तीनपेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्यास कोणतीही मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.