हजारो जनावरांचा जीव धोक्‍यात 

हजारो जनावरांचा जीव धोक्‍यात 

अलिबाग : थंडीचा हंगाम सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यात जनावरांना लाळखुरकत आजाराची लागण होण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी ही मोहीम धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे हजारो जनावरांचे आरोग्य धोक्‍यात आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारीपासून व्रणोपचारकपर्यंतची सुमारे 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही मोहीम मंदावली आहे. 

जिल्ह्यातील दोन लाख 63 हजार जनावरांपैकी एक लाख 46 हजार जनावरांचे 100 दवाखान्यांमार्फत लाळखुरकत लसीकरण करण्यात आले आहे. एका महिन्यात ते होणे अपेक्षित होते. जिल्ह्यात डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने हे काम धिम्यागतीने होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

लाळखुरकत काय आहे? 
लाळखुरकत या आजारामुळे जनावरांच्या तोंड आणि खुरात जखमा होतात. त्यामुळे जनावरे चारा खाणे बंद करतात. तोंडातून लाळ गळते. जनावर चालताना लंगडते. ताप येतो, त्यांना थकवा निर्माण होऊन तो कोणतेही काम करू शकत नाही. आजारावर वेळीच उपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी होते. 

लाळखुरकत लसीकरणाचे नियोजन केले होते; परंतु तुटपुंज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आधारे हे कामकाज सुरू आहे. 
- बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com