# MeToo अनिर्बान ब्लाह यांचा आत्महत्येचा प्रयत्न    

# MeToo अनिर्बान ब्लाह यांचा आत्महत्येचा प्रयत्न    

नवी मुंबई  - # MeToo मोहिमेंतर्गत चार तरुणींनी लैंगिक शोषणाबाबत केलेल्या आरोपांना तोंड देत असलेले अनिर्बान दास ब्लाह (वय ४०) यांनी गुरुवारी मध्यरात्री वाशी खाडी पुलावर आत्महत्येचा प्रयत्न केला. ब्लाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘केडब्ल्यूएएन’(क्‍वॉन) या सेलिब्रिटी मॅनेजमेंट एजन्सीचे पार्टनर आहेत. ते खाडी पुलावरून उडी टाकण्याच्या तयारीत असताना वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

मुंबईतील खार परिसरात राहणाऱ्या ब्लाह यांच्यावर चार तरुणींनी  # MeToo मोहिमेंतर्गत सोशल मीडियाद्वारे लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात बदनामी झाल्याने आणि कंपनीतून अपमानास्पदरीत्या बाहेर पडावे लागल्याने ते मानसिक तणावाखाली होते. गुरुवारी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास ते वाशी खाडी पुलावर आत्महत्येसाठी पोचले. ते पुलावर अंधारात घुटमळत असल्याचे वाशी वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक बगाडे यांच्या पथकाला दिसले. बगाडे यांनी तातडीने ब्लाह यांना ताब्यात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्यासमोर हजर केले. या वेळी केलेल्या चौकशीत ब्लाह हे खाडीत उडी टाकून आत्महत्या करणार होते, असे उघड झाले. # MeToo प्रकरणात झालेल्या बदनामीमुळे आपल्या डोक्‍यात आत्महत्येचा विचार आल्याचे ब्लाह यांनी पोलिसांना सांगितले. 

कंपनीच्या इतर पार्टनरशी वाद
ब्लाह यांच्यावरील आरोपांमुळे बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्यांचे काम सांभाळणाऱ्या ‘क्‍वॉन’ कंपनीची बदनामी होऊ लागली आहे. यावरून कंपनीचे इतर नऊ पार्टनर्स आणि ब्लाह यांच्यामध्ये वाद झाले. याच दरम्यान कंपनीची बदनामी होत असल्याच्या कारणावरून इतर पार्टनर्सनी ब्लाह यांना कंपनीतून दूर केले.

छाबरा यांची चित्रपटातून हकालपट्टी
‘दि फॉल्ट इन अवर स्टार्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करू पाहणारे दिग्दर्शक मुकेश छाबरा यांना आज लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर चित्रपटातून बाहेर पडावे लागले आहे. ‘फॉक्‍स स्टार स्टुडिओज’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये याप्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल, असे नमूद करत ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत छाबरा यांना काढून टाकण्यात येत असल्याचे म्हटले आहे. 
# MeToo कॅम्पेनअंतर्गत ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजन यांच्यावरदेखील लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. यानंतर आता अभिनेता रणबीर कपूरने या चित्रपटातून अंग काढून घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com