मुंबईत आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

डी एन नगर पोलीस ठाणे परिसरात राहणार्या अभिनेत्री अंजली श्रीवास्तव, (वय- 29) हिने राहत्या घरी अात्महत्या केली.

मुंबई:: डी एन नगर पोलीस ठाणे परिसरात राहणार्या अभिनेत्री अंजली श्रीवास्तव, (वय- 29) हिने राहत्या घरी अात्महत्या केली.

अंजलीला तिचे नातेवाईक वारंवार फोन करत असताना, ती फोन उचलत नव्हती. अखेर त्यांनी ती राहत असलेल्या परिमल सोसायटी रूम न 501, जुहूलेंन अंधेरी(प) या घरमालकास फोनवरून संपर्क साधून तिची चौकशी करावयास सांगितली. घरमालकाने आपल्या जवळील चावीने दरवाजा उघडला असता अंजलीने साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला होता. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णयलय येथे दाखल करण्यात आला आहे.  घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी वा पत्र पोलिसांना साप़डले नसून तिने आत्महत्या कधी व का केली आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Anjali Shrivastav found dead esakal news