कोरोनाकाळातील कामगिरीचा परिणाम, नवी मुंबई आयुक्तांच्या बदलीचा निर्णय स्थगित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीला अखेर राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मिसाळ कायम राहणार आहेत.

नवी मुंबई :: महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीला अखेर राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मिसाळ कायम राहणार आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण नियंत्रणात आणण्यासाठी मिसाळ यांनी उचललेल्या पावलांमुळे सरकारने ही स्थगिती दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

मीरा-भाईंदर, ठाणे आणि उल्हासनगर या महापालिका आयुक्तांच्या बदलीसोबत 23 जूनला नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बदली केली होती. सरकारने अचानकपणे या सनदी अधिकाऱ्यांच्या तडका-फडकी बदली केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता. त्यावेळी बदली करतेवेळी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचे कारण पुढे करण्यात आले होते.

वृत्तपत्र वितरणास मज्जाव केल्यास कारवाई; जिल्हा उपनिबंधकांचा सोसायट्यांना इशारा
 

मात्र नवी मुंबईत कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी मिसाळ चांगले काम करीत असतानाही बदली केल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. मिसाळ यांच्या जागी नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची महापालिकेचे पद कनिष्ट प्रशासकीय श्रेणीत अवनत करून नियुक्ती केल्यामुळे मिसाळ यांच्या नियुक्तीवर शंका निर्माण झाली होती. त्यामुळे या बदलीविरोधात काही जणांनी हरकत घेत स्थगिती देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

मिसाळ हे फक्त आयुक्त नसून निवडणूक आयोगाने त्यांना महापालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासक म्हणून देखील नेमणूक केली आहे. याचा विसर सरकारला पडला होता. त्यांची बदली करताना निवडणूक आयोगाला विश्वासात घेणे गरजेचे होते. मिसाळ यांनी कोरोना वाढू नये म्हणून सर्वात आधी क्वारंटाईन केंद्र शहराबाहेर हलवले. त्याठिकाणी रुग्णांची उत्तम काळजी घेतली. शहराबाहेर रुग्ण असताना तात्काळ वाशीत तब्बल 1200 बेडचे अद्ययावत कोरोना विशेष रुग्णालय उभारले. या रुग्णालयामुळे अनेक गरीब रुग्णांना आधार मिळाला.

"...हा तर एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न; आयुक्तांच्या बदल्या उपाय नाही"

शहरातील नागरिकांसाठी खाजगी लॅबच्या माध्यमातून सुमारे 15 हजार  कोरोना टेस्ट करण्याचा करार केला. तात्काळ अहवाल प्राप्त होण्यासाठी स्वतंत्र लॅबची देखील पायाभरणी मिसाळ यांच्या माध्यमातून सुरू आहे. शहरात कोरोनामुळे वैद्यकीय आणीबाणीची परिस्थितीत उद्भवली असताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम मिसाळ करीत आहेत. त्यामुळे मिसाळ यांच्या बदलीला स्थानिक राजकीय नेत्यांनीही विरोध केला होता.

मिसाळ यांची बदली थांबवण्यात शिवसेनेचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाची भूमिका पार पडली आहे. मिसाळ यांना नवी मुंबईत नियुक्त होऊन अवघा एक वर्ष उलटला असल्याने आणखीन काही वर्षे मुदत देण्याबाबत नगरविकास विभागात एकमत झाल्यावर मिसाळ यांची बदली अवघ्या दोन दिवसांत थांबवण्यात आली आहे. 

बाळ रडले अन् 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात आली...
 

अभिजित बांगर माघारी : 

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तात्काळ बदली केल्यावर त्यांच्या जागी नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेच्या आयुक्त पदाचा दर्जा अप्पर सचिवा दर्जाचा असताना बांगर यांच्यासाठी पद कनिष्ट प्रशासकीय श्रेणीत अवनत करण्यात आला होता. त्यामुळे मंत्रालयातील काही आयएएस अधिकारी नाराज झाल्याचे समजते आहे. त्यामुळे मिसाळ यांची झालेली बदलीचा निर्णय माघे घेण्यात आल्याची चर्चा आहे.

annasaheb misal retained as commissioner of navi mumbai transfer orders cancelled


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: annasaheb misal retained as commissioner of navi mumbai transfer orders cancelled