"...हा तर एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न; आयुक्तांच्या बदल्या उपाय नाही"

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

ठाणे जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून त्याला आयुक्त बदलणे हा उपाय नव्हे , अशा पद्धतीने शिपायांच्या देखील बदल्या करण्यात येत नाहीत. या सर्व बदल्यांमध्ये मोठे गौडबंगाल असून, मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छाटच्या हा प्रयत्न असल्याचा संशय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्यात व्यक्त केला आहे. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून त्याला आयुक्त बदलणे हा उपाय नव्हे , अशा पद्धतीने शिपायांच्या देखील बदल्या करण्यात येत नाहीत. या सर्व बदल्यांमध्ये मोठे गौडबंगाल असून, मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छाटच्या हा प्रयत्न असल्याचा संशय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्यात व्यक्त केला आहे. 

ही बातमी वाचली का? काय सांगता; 'रेमेडेसीवीर' औषध मिळणार मोफत! पण कुठे, वाचा बातमी सविस्तर

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात येऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हजार बेडच्या रुग्णालयाला भेट देण्याबरोबच क्वारंटाईन सेंटरला देखील भेट दिली. तसेच पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त बदलून विषय सुटत नसून, आपण तशाप्रकारची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. पुरेसे मन्युष्यबळ उभे करणे आवश्यक आहे.  तीन महिने जेव्हा एखादा आयुक्त संपूर्ण यंत्रणा उभी करतो आणि लोकांचे आरोप झाले किंवा यंत्रणा कोलमडली कि त्यांच्या जागी नवा आयुक्त आणणे हे योग्य नाही. नवीन आयुक्तांना पुन्हा परिस्थिती समजून घेण्यास वेळ लागतो असे मत दरेकर यांनी व्यक्त केले. 

ही बातमी वाचली का? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठीही आता 'एक्सप्रेसवे'ला चालना?

ठाणे जिल्ह्यात चार महापालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या असून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने या बदल्या करण्यात आल्या असल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी काही आयुक्तांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र नगरविकास खात्यांचे मंत्री असताना त्यांना न कळवता मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होत नाही ना ? अशी आमच्या मनात दाट शंका असल्याचे दरेकर यांनी सांगितले. ठाणे, वसई विरार, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या भागात 13 जूनपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

ही बातमी वाचली का? बाळ रडले अन् 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात आली...

हे रोखण्यामध्ये सरकार अक्षरशः अपयशी ठरले असून पालिका यंत्रणा देखील अपयशी ठरल्या आहेत. अधिकाऱ्यांचा एकमेकांमध्ये समन्वय नाही. प्रशासन आणि यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाले असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाण्यात केवळ हॉस्पिटल उभारून उपयोग नाही, त्यात कर्मचारीच नसतील तर फायदा काय ? यासाठी राज्यशासनाकडे पाठपूरावा करणार असल्याचे देखिल दरेकर म्हणाले.

ही बातमी वाचली का? मुंबईनंतर आता MMR क्षेत्रातही ‘आकडों की हेराफेरी'; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप..

गोपीचंद पडळकर स्पष्टीकरण देतील 
शरद पवार यांच्या बाबत गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य हि पक्षांची भूमिका नव्हती. एखाद्या मोठ्या नेत्याबाबद्दल असे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे  कालच देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सांगितले आहे. त्यामुळे यासंदर्भात पडळकर स्पष्टीकरण देणार असून, त्यांनतर देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते पक्षाची भूमिका मांडतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to trim Eknath Shinde's power Opposition leader Praveen Darekar's opinion