बेस्ट विलीनीकरणाची घोषणा हवेतच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता सल्लागार

समीर सुर्वे
Thursday, 4 February 2021

बेस्टची आर्थिक परिस्थितीत सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.

मुंबई: बेस्टला महापालिकेत विलीन करण्याची शिवसेनेची घोषणा हवेतच विरली आहे. बेस्टची आर्थिक परिस्थितीत सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.  तर 750 कोटी रुपयांच्या अनुदानासह कर्मचाऱ्यांच्या थकित देण्यासाठी पालिका 406 कोटी रुपये अल्प व्याजाने देणार आहे. त्याचबरोबर कोव्हिड काळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांचे अनुदानही पालिकेकडून दिले जाणार आहे. 

गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने बेस्टला पालिकेत विलीन करण्याची घोषणा केली होती. आता पुढील निवडणुकीला फक्त वर्ष शिल्लक असतानाही ही घोषणा अद्याप पूर्ण झालेली नाही. यापुढेही हे विलीनीकरण होण्याची शक्‍यता कमीच आहे. कारण बेस्टच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती बुधवारी आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बेस्टला पालिकेने आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. यंदा 750 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तर तीन हजार 349 निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यासाठी 406 कोटी देणार आहे. कोव्हिड काळात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे अनुदान देणे अद्याप बाकी आहे. बेस्टच्या 101 कर्मचाऱ्यांचा या काळात मृत्यू झाला होता. या अनुदानाची रक्कमही महापालिका देणार आहे.

हेही वाचा- म्हाडाच्या रहिवाशांना दिलासा, संपूर्ण थकीत भाडे भरल्यास मिळणार 'ही' सवलत

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Announcement best merger is now in the air to improve the financial situation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement best merger is now in the air to improve the financial situation