कोस्टल रोडसाठी आणखी 102 हेक्टर समुद्रात भरणी; बोगद्याचे खोदकामाला 7 जोनवारी पासून सुरवात

समीर सुर्वे
Monday, 21 December 2020

नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या 12 हजार 721 कोटी रुपयांच्या सागरी किनारी मार्गासाठी आता पर्यंत 175 एकर समुद्रात भरणी टाकण्यात आली असून अजून 102 एकर समुद्रात भरणी टाकण्यात येणार आहे.

मुंबई : नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या 12 हजार 721 कोटी रुपयांच्या सागरी किनारी मार्गासाठी आता पर्यंत 175 एकर समुद्रात भरणी टाकण्यात आली असून अजून 102 एकर समुद्रात भरणी टाकण्यात येणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी पर्यंतच्या बोगद्याचे खोदकाम 7 जानेवारी पासून सुरु होणार आहे. असे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.जुलै 2023 पर्यंत कोस्टल रोडवरुन वाहाने सुसाट धावणार आहेत.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी पर्यंत 2.07 किलोमिटर लांबीचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत.हे काम दिड वर्षात पुर्ण होणार आहे.यासाठी भारतीतील सर्वात मोठी टनल बोअरींग मशिन वापरण्यात येत आहे.या मशिनचा व्यास 39.6फुट असून लांबी 400 मिटर आहे.ही मशिन चिन मधून आणण्यात आली आहे.मशिन चिन मधून आणल्यानंतर तीची जुळणी करण्यासाठी चिनचे तंत्रज्ञ येणार होते.मात्र,याच काळात भारत आणि चिन मधील संबंध ताणल्याने भारतीय तत्रज्ञांनी या मशिनची जुळवणी केली आहे.हे काम आता पुर्ण झाले असून 7 जानेवारी पासून खोदकामाला सुरवात होणार आहे.
किनारी मार्गासाठी समुद्रात टाकल्या जात असलेल्या भरणीमुळे वाद निर्माण झाले आहेत.महापालिकेने आता पर्यंत 175 ,,,,कर समुद्रात भरणी टाकली असून अजून 102 ,लललक समुद्रात भरणी टाकण्यात येणार आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच शास्त्रीय पद्धतीने पक्षांची गणना

17 टक्के काम 10 टक्के खर्च
या प्रकल्पाच्या काम अाता पर्यंत 17 टक्के काम पुर्ण झाले आहे.या प्रकल्पासाठी 12 हजार 721 कोटी रुपयांचा खर्च असून नोव्हेंबर अखरे पर्यंत 1हजार 281 रुपये खर्च झाले आहेत.अशी माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

Another 102 hectares of sea filling for Coastal Road Excavation of the tunnel will start from January 7

-----------------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 102 hectares of sea filling for Coastal Road Excavation of the tunnel will start from January 7