एमबीएचे आणखी २९ बोगस विद्यार्थी

एमबीएचे आणखी २९ बोगस विद्यार्थी


मुंबई : या शैक्षणिक वर्षात एमबीए अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे दिल्याचे समोर आल्यानंतर मागील वर्षी आणखी २९ विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे प्रवेश मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा आदेश प्रवेश नियामक प्राधिकरणाने तंत्रशिक्षण संचालकांना दिला आहे.


२०१९-२० या शैक्षणिक वर्षात एमबीए प्रवेशासाठी खोटी गुणपत्रके व माहिती देऊन १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवल्याचे समोर आले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांचे प्रवेश तत्काळ रद्द करण्यात आले. त्यानंतर मागील तीन वर्षांतही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रवेश घेतले होते का, हे तपासण्यासाठी सीईटी सेलने समिती नेमली होती. या समितीने संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यासाठी सीईटी सेलने महाविद्यालयांनाही बोलावले होते. या तपासणीत २९ विद्यार्थ्यांनी बोगस प्रवेश घेतल्याचे व दोन विद्यार्थ्यांच्या नावात बदल केल्याचे समोर आले आहे.


२०१८-१९ मध्ये झालेल्या सर्व प्रवेशांची माहिती घेतल्यानंतर तब्बल २९ विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे. हे विद्यार्थी वेगवेगळ्या संस्थांमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. प्रवेश नियामक प्राधिकरणाने (एआरए) यासंदर्भातील अहवाल तयार केला असून, संचालकांच्या स्तरावर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

परीक्षा न देताच प्रवेश
या २९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवेळी खोटी माहिती व बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देताना हॉल तिकीट घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी परीक्षा न देताच प्रवेश घेतल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com