फेक टीआरपी प्रकरणात आणखी एकाला अटक, आरोपींची संख्या दहावर

अनिश पाटील
Monday, 26 October 2020

फेक TRP प्रकरणी गुन्हेशाखेने मीडिया कंपनीशी संबंधित अमित उर्फ अजित ऊर्फ अभिषेक भजनदास कोलावडेला रविवारी अटक केली. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे.

मुंबई: फेक TRP प्रकरणी गुन्हेशाखेने मीडिया कंपनीशी संबंधित अमित उर्फ अजित ऊर्फ अभिषेक भजनदास कोलावडेला रविवारी अटक केली. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे.

कोलावडे याचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. पण तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याला पळण्यासाठी मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने यापूर्वी
हरिष कमलाकर पाटील (45) याला अटक केली होती. आरोपी कोलावडेच्या संबंधित खात्यातून संशयित व्यवहार झालाचा संशय असून त्याप्रकणी पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर रविवारी कोलावडे गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर शरण आला असून त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.  

पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात आतापर्यंत फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महामूव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक टीव्ही अशी पाच वाहिन्यांची नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

अधिक वाचा-  टिबी रुग्णालय मृतदेह प्रकरण: वॉर्डच्या संबंधित असणाऱ्या 60 कर्मचाऱ्यांना मेमो

कोळवाडेच्या अटकेच्या वृत्ताला सहपोलिस आयुक्त( गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी दुजोरा दिला आहे. कोलावडे पूर्वी याप्रकरणी हरिष पाटील, दिनेश विश्वकर्मा (37) आणि रामजी वर्मा (44), हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (21), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (44), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (47), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (44) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठी व उमेश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. संशयित वाहिन्यांच्या खात्यातील पैशांची आणि व्यवहारांची तपासणी होणार आहे. रिपब्लिक टीव्हीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या  यांची नावे याप्रकरणी आली आहे. याशिवाय आणखी वाहिन्यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण त्याबाब अद्याप ठोस पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले याप्रकरणी आतापर्यंत टीआरपी स्कॅम प्रकरणात 40 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Another arrested in fake TRP case ten accused


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another arrested in fake TRP case ten accused