टिबी रुग्णालय मृतदेह प्रकरण: वॉर्डच्या संबंधित असणाऱ्या 60 कर्मचाऱ्यांना मेमो

टिबी रुग्णालय मृतदेह प्रकरण: वॉर्डच्या संबंधित असणाऱ्या 60 कर्मचाऱ्यांना मेमो

मुंबई: शिवडीच्या टीबी रुग्णालयात एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी येथील परिचारिकांना मेमो देण्याची कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत त्या वॉर्डमधील जवळपास 60 कर्मचाऱ्यांना मेमो देऊन स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या प्रकरणी पालिकेकडून चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सोमवारपासून त्या सर्वांची चौकशी करेल अशी माहिती शिवडी टिबी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ललितकुमार आनंदे यांनी दिली आहे. 

दरम्यान, परिचारिकांवर केलेली कारवाई चुकीची असून यावर महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास आक्षेप घेतला असून परिचारिकांना दोषी का ठरवता ? असा सवाल उपस्थित केला आहे. 

शिवडीच्या टीबी रुग्णालयात दुर्गंध येत असल्याने ही दुर्गंधी शौचालयातून येत असल्याची माहिती येथील आयाबाईने दिली. दरवाजा उघडला नसल्याने दरवाजाच्या फटीतून कर्मचाऱ्यांनी पाहिले असता कुजलेला मृतदेह दिसला. मृतदेहाला किडे पडल्याचे ही आढळले. कर्मचार्‍यांनी हा प्रकार अधिष्ठात्यांच्या ध्यानात आणून दिला. पोलिसांना ही कळवण्यात आले. तसेच तपासणी करून तातडीने हा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला. 

शुक्रवारी घडलेल्या या प्रकरणात रुग्णालयातील परिचारिकांना मेमो देण्यात आले असल्याचे ऍड प्रकाश देवदास यांनी सांगितले. देवदास यांनी सांगितले की, वॉश रूम्स चेक करण्याचे काम परिचारिकांचे नसून रोज वॉश रुम्स स्वछ करणाऱ्यांचे आहे. रुग्णालयात काहीही घडलं की परिचारिकांना दोषी ठरविणे योग्य नाही. वॉश रुमचा दरवाजा उघडत नाही अशी तक्रार इंजिनियरकडे केली होती. त्यांची शहनिशा केली असती तर हे घडले नसते. मात्र सरसकट परिचारिकांना या प्रकरणांत दोशी धरता येणार नाही, असे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी सांगितले. 

दरम्यान गेल्या पंधरा दिवसांचे केलेले काम लिखित स्वरूपात द्यावे असे आदेश फक्त परिचारिकांनाच नव्हे तर सर्वच कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याचे येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

प्रत्येक वेळेस रुग्णालयात काहीही झाले तरी आधी परिचारिकांना दोषी ठरवलं जातं. परिचारिका रुग्णांची काळजी घेण्यात व्यस्त असतात. त्यामुळे, या प्रकरणात पुन्हा त्यांना दोषी ठरवून मेमो देणे चुकीचे आहे. एका अहवालानुसार, वॉशरुमचा दरवाजा पावसामुळे फुगला होता असल्याचे कळले आहे. त्यामुळे, तो उघडत नव्हता. याबाबतीत काही रुग्णांनी इंजिनियरिंग विभागाला माहिती दिली होती. पण, तिकडे कोणीही लक्ष दिले नाही. बेपत्ता असलेल्या रुग्णांकडे लक्ष देणे हे परिचारिकांचे काम नाही. आतापर्यंत 42 परिचारिकांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तर, 2 सिस्टर इंचार्जला मेमो दिला असल्याचे कळत आहे. 

ऍड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना 

नैसर्गिक मृत्यूची नोंद

दरम्यान, या मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात नैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्या मृतदेहाचे दात ठेऊन घेतले आहे. त्या रुग्णाचा मृत्यू कधी झाला अशी इतर माहितीही गरजेची आहे. रविवारी सकाळी ही बैठक झाली आहे. मृतदेहाचा वास का कोणालाच आला नाही? हा प्रश्न आहेच. कोविड परिसर असल्याकारणाने तिथे जास्त कोणी जात नाही. त्यामुळे, आता सोमवारपासून होणार्या चौकशीत जे काही आहे ते समोर येईल असेही डॉ. आनंदे यांनी सांगितले आहे.

---------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

TB Hospital Corpse Case Memo 60 staff belonging ward

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com