अंधेरीत दुसरा पूलही धोकादायक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

अंधेरी पूर्व-पश्‍चिम जोडणारा दुसरा पादचारी पूलही धोकायदा स्थितीत आहे. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील वादामुळे या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. पर्याय नसल्याने रोज शेकडो पादचारी जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करत आहेत. 
 

मुंबई - अंधेरी पूर्व-पश्‍चिम जोडणारा दुसरा पादचारी पूलही धोकायदा स्थितीत आहे. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील वादामुळे या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. पर्याय नसल्याने रोज शेकडो पादचारी जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करत आहेत. 

अंधेरी मेट्रो स्थानकाला लागूनच 70 वर्षे जुना पादचारी पूल आहे. काही वर्षांपूर्वी या पुलावर मोठ्या संख्येने फेरीवाल्यांचा वावर असायचा. अंधेरी पश्‍चिमेतील चप्पल गल्लीतून सुरू होणारा हा पूल पूर्वेला मेट्रो स्थानकाजवळ जातो. 

मेट्रो सुरू झाल्यावर दुरुस्तीनंतर हा पूल अरुंद करण्यात आला. त्यानंतर प्रवाशांसाठी खुला झाला होता. सद्यस्थितीत पूल बिकट अवस्थेत आहे. पूल महापालिकेचा असून पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पालिकेने रेल्वेला तब्बल 90 लाख रुपये दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार रेल्वेने स्वत:च्या अखत्यारितील पश्‍चिमेकडील भागाची डागडुजी केली; मात्र उर्वरित भाग तसाच राहिला आहे. या पुलाखालून दररोज हजारो लोकलची ये-जा सुरू आहे. त्यामुळे या पुलाची दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. रेल्वेकडून याबाबत मौन बाळगले जात आहे. 

70 वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम केले. दुरुस्तीसाठी दोन्ही यंत्रणांनी समन्वय साधणे आवश्‍यक आहे. या दोघांच्या वादात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. 
- कैलास वर्मा, सरचिटणीस, रेल्वे प्रवासी संघटना 

Web Title: Another bridge dangerous in andheri