esakal | बिबटयाचा आणखी एक प्राणघातक हल्ला Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बिबटयाचा आणखी एक प्राणघातक हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे (Aarey) दुग्ध वसाहतीजवळ बिबट्याने (Lepord) आणखी एक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राजेश रावत (Rajesh Rawat) हा 19 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. या आठवड्यातील हा तिसरा हल्ला आहे. याआधी बिबट्याच्या हल्ल्यात वयस्कर महिला तसेच लहान मूल जखमी झाले होते.

आरे वसाहतीजवळील युनिट क्रमांक 7 मध्ये राजेश रावत हा तरुण अभिषेक भारद्वाज या आपल्या मित्राला सोडायला गेला होता. त्यावेळी घराकडे परतत असतांना चित्र नगरी रोड पंजाब ढाबा सुनील मैदान येथे रात्री नऊच्या दरम्यान बिबट्याने राजेशवर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश जखमी झाला आहे.त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून हात,पाय आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. जखमी राजेशला ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Mumbai

Mumbai

हेही वाचा: Thane : गायमुख घाटात विचित्र अपघात; ३ जण जखमी

चित्र नगरीतील संपूर्ण परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात बिबट्याचे दर्शन देखील पहावयास मिळते. हा परिसर गर्द झाडीने व्यापलेला असल्याने तेथील रस्त्यावरून प्रवास करताना अनेक वेळा बिबट्या दिसतात.आरे कॉलनी परिसरात बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. महिन्याभरात बिबट्याने चार जणांवर हल्ला करुन जखमी केले आहे.

loading image
go to top