अरे वाह! कोरोनाच्या लढतीत मुंबईकरांच्या हाती आणखी एक यश

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 1 June 2020

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव मुंबईत आहे. मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोनाच्या लढतीत मुंबईकरांनी आणखी यश मिळवलं आहे.

 

मुंबई- कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव मुंबईत आहे. मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोनाच्या लढतीत मुंबईकरांनी आणखी यश मिळवलं आहे. कोरोनाच्या उपचारांमुळे मृत्यूचं प्रमाण कमी राखण्यात मुंबई महापालिकेला यश मिळालं आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सरासरी 3.2 टक्के आहे. तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सरासरी 46 टक्के आहे.

जिद्दीला सलाम! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात....

मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या 30 मे 2020 पर्यंत 38 हजार 220 इतकी होती. त्यापैकी आतापर्यंत 16 हजार 364 रुग्ण बरे झालेत. त्यांना आता  रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. तर एक हजार 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विविध दीर्घकालीन आजार असलेल्यांची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले आहे.

हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्यावाढीचा दर मंदावला

मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्यावाढीचा दर मंदावला. मुंबईच्या चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 8% पेक्षा जास्त आहे.  वरळी, धारावीत रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला चित्र सध्या पाहायला मिळतंय. मुंबई महापालिकेच्या 27 मे रोजीच्या अहवालानुसार पालिकेच्या दादर जी-उत्तर, भायखळा ई विभाग, माटुंगा एफ-उत्तर, अंधेरी के-पश्चिम सांताक्रुज एच-पूर्व आणि कुर्ला एल विभाग या सहा विभागांत दोन हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले. तर आता धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 3.6% आहे. वडाळा, सायन विभागाचा समावेश असलेल्या एफ नॉर्थ मध्येही 3.6% इतका आहे.

कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
 

वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या जी-दक्षिण विभागात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून, येथे 1,905 रुग्ण आढळून आलेत. पालिकेच्या नऊ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील कोरोना रुग्णांनी एक हजाराचा आकडा पार केला असून, या विभागात हजार ते 1900 पर्यंत रुग्ण सापडलेत. पण आता वरळीचा समावेश असलेल्या जी साऊथमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 3.1% आहे.

कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

घाटकोपर एन विभागात रुग्णांचा आकडा 1,525 वर पोहोचला आहे. अंधेरी के-पूर्व आणि मानखुर्द एम-पूर्व विभागातही अनुक्रमे 1,875 आणि 1,696 रुग्ण सापडलेत. बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांमध्ये प्रभादेवी जी दक्षिण विभागात 833 भायखळा ई विभागात 803 जणांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another success of Mumbaikars in the battle of Corona