esakal | अंटार्टिकामध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद..
sakal

बोलून बातमी शोधा

अंटार्टिकामध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद..

अंटार्टिकामध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - पर्यावरण, जागतिक तापमान यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते, अनेक मोठ्या व्यासपीठांवरून बोललंही जातं. मात्र यासंबंधी अंमलबजावणी केल्याचं कुठल्याही निष्कर्षातून प्रखरपणे समोर येत नाहीये. जगभरात पर्यावरण रक्षणासाठी अनेक रिसर्च, कार्यशाळा, संवाद आयोजित केले जातायत. मात्र त्याचा उपयोग होतोय का ? आपण पर्यावरणासंदर्भात खरंच गंभीर आहोत का ? असा प्रश्न विचारायची आता वेळ आलीये. 

मोठी बातमी अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..

याला कारण आहे समोर आलेला एक धक्कादायक अहवाल. पृथ्वीचा दक्षिण ध्रुव म्हणजेच अंटार्टिका, अंटार्टिकामध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत कधीही अंटार्टिकात एवढं तापमान नोंदवलं गेलं नव्हतं. दक्षिण ध्रुवावरील 'समर' म्हणजेच उन्हाळ्यातही एवढं तापमान आजतागायत नोंदवलं गेलेलं नाही. नोंदवलेल्या तापमानामुळे जातगतिक तापमानवाढीची समस्या किती गंभीर रूप धारण करतीये याचा अंदाज येईल. 

मोठी बातमी -  दोन तास चार्ज करा, 120 किलोमीटर पळवा! 

अंटार्टिक हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव, याच भागाच्या उत्तरेला असलेलं एक टोक म्हणजे पेंग्विन कॉलनी, अंटार्टिक पेनिन्सुलामधील इस्पेरांझा बेस. या भागात आतापर्यंतचं सर्वात जास्त तापमान नोंदवलं गेलंय. इथे १८.३ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झालीये. गुरुवारी या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. जागतिक हवामान संस्थेने याबाबाद माहिती दिली आहे. या आधी २०१५ मध्ये १७.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. 

मोठी बातमी -  चिकनला स्वस्ताईची फाेडणी

जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरण बदलाचा मोठा परिणाम अंटार्टिक पेनिन्सुला या भागात पाहायला मितोय. पृथ्वीवरील हा भाग सर्वात जास्त वेगात वितळतोय असं आभ्यासकांचं म्हणणं आहे. जागतिक तापमानवाढीचा मोठा फटका दक्षिण ध्रुवावरील ग्लेशर्सला बसलेला पाहायला मिळतोय. मोठमोठे हिमपर्वत वितळण्याचा प्रमाणात दिवसागणिक वाढ होतेय. दरम्यान या तापमान वाढीमुळे येत्या काही वर्षात समुद्राच्या पाण्याची उंची दहा फुटांनी वाढलेली पाहायला मिळणार आहे. 

antarctica logs highest ever temperature on record of 18 point 3 degree celsius

loading image