
सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र भास्कर थत्ते यांचे वृद्धापकाळामुळे नाशिक येथे निधन झाले. थत्ते हे मूळचे हे मुंबईचे निवासी होते. गिरगाव आणि बोरीवली येथे ते राहत होते.
मुंबई : सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र भास्कर थत्ते यांचे वृद्धापकाळामुळे नाशिक येथे निधन झाले. थत्ते हे मूळचे हे मुंबईचे निवासी होते. गिरगाव आणि बोरीवली येथे ते राहत होते. घरातूनच संघसंस्कार घेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या घेत संघाचे कार्य केले. ते संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते होते.
लालकृष्ण अडवाणी यांच्या ऐतिहासिक यात्रेचे संघटनात्मक प्रमुख होते. स्वदेशी जागरण मंचाच्या उभारणीच्या आरंभकाळात त्यांनी मोलाची कामगिरी केली होती. एन्रॉन विरोधी लढ्यात ते अग्रणी होते. या लढ्याला त्यांनी नेमके स्वरूप देऊन त्याची विधायकता टिकवून परिणामकारक स्वरूप देण्यात ते अग्रणी होते.
सुरेंद्रजी यांच्या मुलीने समितीचे पूर्ण वेळ काम केले आहे. त्यांचा मुलगा मिलिंद याने एकल विद्यालयाचे पूर्ण वेळ काम केले आहे. वयम या प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी चळवळीचे काम करणार्या वयम या संस्थेचे प्रमुख मिलिंद थत्ते यांचे ते वडिल होते.
------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)