कोरोनामुक्तीनंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच! आमदार भालकेंच्या निधनानंतर गुंतागुंतीची समस्या ऐरणीवर

कोरोनामुक्तीनंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच! आमदार भालकेंच्या निधनानंतर गुंतागुंतीची समस्या ऐरणीवर
कोरोनामुक्तीनंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच! आमदार भालकेंच्या निधनानंतर गुंतागुंतीची समस्या ऐरणीवर

मुंबई : कोरोनानंतर झालेल्या आरोग्यविषयक गुंतागुंतीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा येथील आमदार भारत भालके यांचे शनिवारी निधन झाले. भालके यांच्या निधनानंतर कोरोनांतरच्या आरोग्याबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला असून, कोरोनानंतर उद्भवणाऱ्या समस्यांवर दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

 
अशाच प्रकारे उच्च रक्तदाब असलेल्या मुंबईतील एका 58 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याने रूग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या रूग्णाला टॉसिलीझुमब, कॉन्व्हल्सेन्ट प्लाझ्मा आणि अँटीवायरल थेरपीच्या स्वरूपात इम्युनोसप्रेशन औषधोपचार केले होते. त्यानंतर त्रास जाणवत असल्याने वैद्यकीय चाचणीत या रूग्णाचे रक्त गोठत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रूग्णाला रक्त पातळ करण्यासाठी इंजेक्‍शन देण्यात आले. साधारणतः 60 दिवस अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. चालण्यास अडचण येत असल्याने त्यांना फिजिओथेरपी देण्यात आली. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रूग्णाला घरी सोडण्यात आले. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्येही काही महिन्यांनंतर थकवा जाणवणे, खोकला, सर्दी, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत. त्यामुळे फुफ्फुसातील फायब्रोसिसची लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घेणे गरजेचे आहे. 50 पेक्षा जास्त वयोमान असलेल्या आणि श्‍वसनाचे विकार असणाऱ्या रूग्णांना यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. फुफ्फुसातील फायब्रोसिस असणाऱ्या रुग्णाला दर दोन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. 

कोरोनानंतर तीन महिने काळजीचे 
कोरोनातून बरे झाल्यानंतर किमान दोन ते तीन महिने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे श्‍वसन प्रक्रिया, फुप्फुस, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रसंगी हृदयविकाराचा झटकाही येण्याची शक्‍यता असते. त्यामुळे जोपर्यंत लस येत नाही आणि कोरोना नियंत्रणात येत नाही तोपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे, असे टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. 

कोरोनामुक्त झालेल्या 15 टक्के रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिडची लक्षणे दिसून येत आहे. त्यांना थकवा जाणवणे, फुफ्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि लठ्ठपणा असणाऱ्या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. प्रसंगी हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नयेत. 
- डॉ. कुंदन मेहता, पल्मोनोलॉजिस्ट. 

--------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com