
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या याचिकेवर ता 6 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या याचिकेवर ता 6 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात नोंदविलेल्या निरीक्षणांची दखल अलिबाग पोलिसांनी घेतली नाही, असा दावा गोस्वामी यांच्या वतीने आज करण्यात आला.
मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अलिबाग पोलिसांनी गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांविरोधात नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्राची दखल अलिबाग न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे गोस्वामी यांनी केलेल्या याचिकेत बदल करायची परवानगी गोस्वामी यांच्या वतीने एड आबाद पोंडा यांनी मागितली. न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने ही मागणी मान्य केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निकालपत्रात केलेल्या निरीक्षणांची दखल पोलिसांनी घ्यायला हवी होती, मात्र ते त्याची दखल घेत नाही, असा युक्तिवाद यावेळी पोंडा यांनी केला. राज्य सरकारकडून एड अमीत देसाई यांनी बाजू मांडली.
BMC च्या स्मार्टफोन उपक्रमाचा कोविड -19 रुग्णांवर सकारात्मक परिणाम
नाईक यांना आत्महत्येस प्रव्रुत्त केल्याची फौजदारी फिर्याद नाईक यांच्या मुलीने अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामध्ये यापूर्वी पोलिसांनी ए समरी अहवाल दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस आता तपास करू शकत नाही असा दावा याचिकादारांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली होती.
Anvay Naik case Alibag police did not heed the Supreme Court verdict; Goswami claims
------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )