esakal | किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अन्वय नाईक कुटुंबियांचं सणसणीत उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अन्वय नाईक कुटुंबियांचं सणसणीत उत्तर

उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला. आता किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर अन्वय नाईक कुटुंबियांनीही खुलासा करत टोलाही हाणला आहे. किरीट सोमय्या दावा करत असलेले जमिनीचे व्यवहार झाले असल्याची माहिती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली आहे.  

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अन्वय नाईक कुटुंबियांचं सणसणीत उत्तर

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर भाजपनं राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक कुटुंबासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जमिनीचे आर्थिक व्यवहार आहेत, उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला. आता किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर अन्वय नाईक कुटुंबियांनीही खुलासा करत टोलाही हाणला आहे. 

किरीट सोमय्या दावा करत असलेले जमिनीचे व्यवहार झाले असल्याची माहिती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली आहे.  एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंबंधी सर्व खुलासे केलेत. आज्ञा नाईक आणि अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्यांना चांगलेच फटकारून काढले आहे. त्यावेळी काय बोबडी वळती होती का, असा सणसणीत टोलाही अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्यांना लगावला आहे. 

मला बऱ्याच लोकांकडून कळलं असून व्हिडीओ देखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. किरीट सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते, असंही आज्ञा नाईक म्हणालेत. 

अधिक वाचा-  उद्धव ठाकरेंवर जमीन व्यवहाराचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

जमीन कुणीही विकत देऊ शकत नाही का? हा संपूर्ण योग्य मार्गाने व्यवहार झाला आहे.  पण या आरोपांचा अन्वय नाईक यांच्या आत्महत्येशी काय संबंध आहे? नेमकं आताच सोमय्यांना याची आठवण कशी झाली, त्यांना काय दाखवायचं आहे. सोमय्यांनी आणखी मेहनत घेऊन कागदपत्र शोधून काढावी. जर काही मदत लागली तर मला सांगावे, मी मदत करायला येईल, असंही त्या म्हणाल्यात.

किरीट सोमय्यांना राजकारण करायचं असेल तर ते काहीही मुद्दे समोर आणू शकतात. पण हे आत्ता आणण्यामागचं काय प्रयोजन आहे हे मलाच विचारायचं आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?, असा सवालही आज्ञा नाईक यांनी उपस्थित केला आहे. 

अधिक वाचा-  अर्जुन रामपाल चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल, जवळच्या मित्राला अटक

अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ५ मे २०१८ ला जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का?, असंही त्या म्हणाल्यात.

किरीट सोमय्या यांना राजकारण करण्यासाठी काहीही मुद्दे आणू शकता. पण त्यांना आताच हे मुद्दे समोर आणण्यामागे कारण काय आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?' असा थेट सवाल आज्ञा नाईकने सोमय्यांना विचारला आहे.

Anvay Naik family responds sharply Kirit Somaiya allegations