वाईट बातमी : यावर्षी पगारवाढीची अपेक्षा ठेऊ नका, कारण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

मुंबई - भारतात मार्च ते एप्रिल दरम्यान नोकरदार वर्गाची पगारवाढ होत असते. मात्र यावर्षी पगारवाढीकडे डोळे लावून बसलेल्या नोकरदार वर्गाची काहीशी निराशाच होणार आहे. नुकत्याच झालेल्या एऑन सॅलरी इन्क्रीज सर्व्हे २०२० मध्ये याबद्दलचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वर्षी भारतीय नोकरदारांना गेल्या दशकातली सर्वांत कमी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई - भारतात मार्च ते एप्रिल दरम्यान नोकरदार वर्गाची पगारवाढ होत असते. मात्र यावर्षी पगारवाढीकडे डोळे लावून बसलेल्या नोकरदार वर्गाची काहीशी निराशाच होणार आहे. नुकत्याच झालेल्या एऑन सॅलरी इन्क्रीज सर्व्हे २०२० मध्ये याबद्दलचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वर्षी भारतीय नोकरदारांना गेल्या दशकातली सर्वांत कमी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी -​ "७ कोटी रुपये जमा करा, नाहीतर आम्ही शहीद व्हायला तयार"; लष्कर ए तोयबाचा ई-मेल

यावर्षी मागच्या १० वर्षांतील सर्वात कमी पगारवाढ होणार आहे, असं एऑन सॅलरी इन्क्रीज सर्व्हे २०२०मध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पगारवाढ होण्याची अपेक्षा असलेल्या नोकरदार वर्गाची निराशा होणार आहे. यावर्षीची जास्तीत जास्त पगारवाढ ९.१ टक्के टक्के एवढीच असेल. २००९ मधल्या मंदीनंतरची ही सर्वांत कमी पगारवाढ ठरण्याची शक्यता आहे.

Aon नं  केलेल्या सर्व्हेमध्ये १००० हून जास्त कंपन्यांकडून माहिती गोळा करण्यात आली. या डेटाच्या आधारे त्यांनी बांधलेल्या अंदाजात सर्वच क्षेत्रातील कंपन्या फार मोठी पगारवाढ देणार नाहीयेत. २० वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा अभ्यास केल्यानंतर Aon नं हा निष्कर्ष मांडला आहे.

मोठी बातमी -​ "गुलशन कुमार यांची हत्या होणार हे ठाऊक होतं" राकेश मारियांचा खळबळजनक खुलासा...

कोणत्या क्षेत्राला किती मिळणार पगारवाढ:
 

 • ई-कॉमर्स कंपनी -- १० टक्के
 • प्रोफेशनल उद्योग -- १० टक्के
 • मेडिकल आणि फार्मसी क्षेत्र -- ९.९ टक्के
 • आयटी क्षेत्र -- ९.६ टक्के
 • एफएमसीजी -- ९.५ टक्के
 • केमिकल्स -- ९.३ टक्के
 • इंजीनीरिंग क्षेत्र -- ९.१ टक्के
 • सीमेंट कंपन्या -- ८.९ टक्के
 • एनर्जी -- ८.८ टक्के
 • इंजीनीरिंग सर्विस -- ८.८ टक्के
 • मेटल्स क्षेत्र -- ८.८ टक्के
 • व्होलसेल क्षेत्र -- ८.६ टक्के
 • मीडिया आणि मनोरंजन -- ८.६ टक्के
 • वित्तीय संस्था -- ८.५ टक्के
 • दूरसंचार क्षेत्र -- ८.५ टक्के  
 • ऑटोमोबाईल क्षेत्र -- ८.३ टक्के
 • रीयल इस्टेट -- ८.२ टक्के  
 • हॉटेल क्षेत्र -- ८.२ टक्के  
 • ट्रान्सपोर्ट क्षेत्र -- ७.६ टक्के 

मोठी बातमी : महाविकास आघाडीतील 'दोन' मंत्र्यांचा घेतला राजीनामा ?

दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारतात होणारी पगारवाढ जास्त असल्याची देखील माहिती या अहवालातून समोर आलीये. 

aon salary increase survey says dont expect increments in FY 2020 2021


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aon salary increase survey says dont expect increments in FY 2020 2021