

मुंबई : आम आदमी पार्टीने (आप) मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्या हस्ते ‘केजरीवाल यांची गॅरंटी’ मुंबई जाहीरनाम्याचे अनावरण करण्यात आले. यामध्ये केजरीवाल की गॅरंटी या नावाने मोफत आणि २४ तास पाणीपुरवठा, २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आरोग्यसेवा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हा जाहीरनामा दिल्ली आणि पंजाबमधील यशस्वी प्रशासन प्रारूपावर (मॉडेलवर) आधारित आहे.