
Mumbai APMC
ESakal
तुर्भे : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकाच्या नेमणुकीला संचालकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार संचालक मंडळाला मुदतवाढ देताना बाजार समितीची निवडणूक तत्काळ घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याने बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.