ऍप बेस्ड टॅक्‍सीला प्रवाशांची पसंती 

ऍप बेस्ड टॅक्‍सीला प्रवाशांची पसंती 

मुंबई  - मुंबईतील काळी पिवळी टॅक्‍सीच्या तुलनेत ऍपवर चालणाऱ्या टॅक्‍सीच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्ष 2017 मध्ये शहरात 57 हजार 810 काळी-पिवळी टॅक्‍सी होत्या. आता 2018-19 मध्ये त्यांची संख्या 44 हजार 566 झाली आहे. मात्र त्यातुलनेत 2017 मध्ये टुरिस्ट टॅक्‍सी 60 हजार 752 होत्या. त्यांना प्रवाशांनी अधिक पंसती दिल्याने, 2019 अखेर त्यांची संख्या 74 हजार 911 झाली आहे. 

यापुर्वी टॅक्‍सीच्या प्रवासाला प्रवाशांची पहिली पसंती होती. त्यामूळे वर्षाला टॅक्‍सीच्या संख्येत वाढ व्हायची. मात्र आता, प्रवाशांनी टॅक्‍सीच्या प्रवासाकडे पाठ फिरवली असल्याने, टॅक्‍सीची संख्या सुद्धा रोडावली आहे. सध्या ऍप आधारीत टुरिस्ट टॅक्‍सीला प्रवाशांनी अधिक पसंती दाखवली आहे. टॅक्‍सी चालवण्यापेक्षा ऍप आधारीत टुरिस्ट टॅक्‍सी चालवण्याकडे युवकांचाही भर असल्याने, टॅक्‍सीची संख्या रोडावली आहे. 

तर दुसरीकडे शहरातील रिक्षाच्या संख्येत सुद्धा वाढ झाली असून ती संख्या एक लाख 37 हजारांवरुन दोन लाख 12 हजारांच्या घरात पोहोचली आहे. ऍप आधारीत टॅक्‍सीची सेवा घरपोच आणि फोनवर उपलब्ध असल्याने प्रवाशांकडून या सेवेला अधीक पसंती आहे. टॅक्‍सी चालकांची मुजोरी, जवळचे भाडे नाकारणे अशा अनेक कारणांमुळे काळी-पिवळी टॅक्‍सीचे प्रवासी कमी होत आहेत. याशिवाय राज्य सरकारने टॅक्‍सी-रिक्षाचे परमिट देणे सुद्धा बंद केले होते. तब्बल 20 वर्षानंतर 2017 पासुन परमिट पुन्हा खुले करण्यात आले. 

ऍप बेस्ड टुरिस्ट टॅक्‍सीच्या वाहकांसाठी बॅच लागत नाही. तर टॅक्‍सीच्या चालकांना बॅच लागते. टॅक्‍सीच्या चालकांना बॅच मिळवण्यासाठी 15 वर्षांचा स्थानिक पुरावा लागतो. त्यामूळेच टॅक्‍सीची संख्या घटली आहे. तर टुरिस्ट टॅक्‍सीला फारसे काही नियम लागू नाही. त्यामूळे संख्या तर वाढलीच असून, चालकाच्या परवान्यावरच टुरिस्ट टॅक्‍सी चालवल्या जात असल्याने प्रवाशांची सुरक्षा सुद्धा धोक्‍यात आहे. 
- ए एल क्वाड्रोस, टॅक्‍सी युनियन महासचिव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com