बनावट मद्य ओळखण्यासाठी ‘ॲप’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

बनावट मद्य रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन ‘ॲप’ विकसित करणार आहे. मद्याच्या बाटलीच्या झाकणावरच बारकोड लावण्यात येणार असून, ते झाकण मोबाईलमध्ये असणाऱ्या ‘ॲप’द्‌वारे स्कॅन केले तर मद्य बनावट आहे की अस्सल, हे ओळखता येणार असल्याचा दावा राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

मुंबई - बनावट मद्य रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन ‘ॲप’ विकसित करणार आहे. मद्याच्या बाटलीच्या झाकणावरच बारकोड लावण्यात येणार असून, ते झाकण मोबाईलमध्ये असणाऱ्या ‘ॲप’द्‌वारे स्कॅन केले तर मद्य बनावट आहे की अस्सल, हे ओळखता येणार असल्याचा दावा राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.  

राज्य सरकारला बनावट मद्यामुळे दरवर्षी जवळपास १८०० कोटी रुपयांचा फटका बसतो. बनावट मद्य रोखता आले तर राज्य सरकारच्या महसुलात १८०० कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचा अंदाज बावनकुळे यांनी व्यक्‍त केला आहे. या ‘ॲप’विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, सीलबंद असलेल्या या बाटलीचे झाकण स्कॅन केल्यावर या बाटलीचा प्रवास स्पष्ट होणार आहे. मळीपासून मद्यापर्यंतचे टप्पे, कुठे, कधी कशापासून तयार झाले, याची सगळी माहिती मिळू शकणार आहे. बाटलीचे झाकण स्कॅन केल्यानंतर ही माहिती आली नाही तर ते मद्य बनावट असल्याचे आपोआपच ओळखता येणार आहे.

महसूल वाढीचा आलेख
२५, ३२३ कोटी रु. - २०१८-१९
१० टक्के - २०१६-१७
९ टक्के - २०१७-१८ 
१६.५ टक्के - २०१८-१९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: App for Bogus Liquor Identify