बीसीजी लसीच्या प्रयोगासाठी केईएम रुग्णालयाकडून आवाहन; कोरोना प्रतिबंधासाठी महत्वाचे पाऊल

भाग्यश्री भुवड
Saturday, 22 August 2020

अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने काही ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्याचा प्रयोग करण्यात येणारे आहे. याच्यासाठी केईएम रुग्णालयकडून आवाहन देखील करण्यात येत आहे. 

मुंबई - कोव्हिड 19 हा आजार जगभर पसरत असताना धोका अधिक वाढत आहे. सार्स कोव्हिड 2 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूमुळे हा आजार होतो. ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेही, उच्चरक्तदाब तसंच इतर जुनाट आजार असणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा संसर्ग लगेच होतो. त्यामुळे या वर्गाला धोका अधिक आहे. अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने काही ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्याचा प्रयोग करण्यात येणारे आहे. याच्यासाठी केईएम रुग्णालयकडून आवाहन देखील करण्यात येत आहे. 

मुंबईकरांनो! गणेशमुर्ती विसर्जन करण्यापुर्वी वाचा 'ही' अत्यंत महत्वाची माहिती

क्षय रोगाच्या प्रतिबंधासाठी ज्या प्रमाणे मुलांमध्ये बीसीजी लसीचा वापर केला जातो. मात्र प्रौढांमध्ये याचा वापर केला जात नाही. मात्र कोव्हिडच्या प्रतिबंधासाठी ज्येष्ठांमध्ये बीसीजी लसीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या साठी केईएम रुग्णालयालाकडून आवाहन करण्यात येत आहे. 60 ते 75 वयोगटातील व्यक्ती, तसेच या व्यक्तीला कोव्हिड, एचआयव्ही, क्षयरोग आणि कर्करोग या रोगाचा संसर्ग नाही अशांना बीसीजी लस मिळू शकते असे सांगण्यात आले आहे. या साठी प्रवास भत्ता ही देण्यात येणार असून सर्व तपासणी विनामूल्य राहणार आहे. चाचणीच्या उद्देशाने काही तपासण्या केल्या जातील त्यांचा खर्च प्रायोजक आणि आयसीएमआर संस्था देणार आहे. 

पुढच्या आठवड्यापासून केईएममध्ये बीसीजी लस दिली जाणार आहे. आतापर्यंत 250 ते 300 कॉल्स स्वयंसेवकांनी केले आहेत. आम्ही आजपासून आमच्या नायगाव केंद्रात बीसीजी चाचणीसाठी नोंदणीसह प्रारंभ केला आहे. 

डॉ. हेमंत देशमुख,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal from KEM Hospital for BCG vaccine experiment