रेल्वे रूळ ओलांडू नका ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे प्रवाशांना आवाहन  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

रेल्वे रूळ ओलांडू नका... रेल्वेच्या छपरावरून प्रवास करू नका... अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शनिवारी रेल्वेतून सीएसटी ते वांद्रे असा प्रवास केला. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. गर्दीला आवरण्यासाठी सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. 

मुंबई - रेल्वे रूळ ओलांडू नका... रेल्वेच्या छपरावरून प्रवास करू नका... अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शनिवारी रेल्वेतून सीएसटी ते वांद्रे असा प्रवास केला. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. गर्दीला आवरण्यासाठी सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. 

तब्बल 37 वर्षांपूर्वी अनुपम खेर यांनी पंजाब मेलमधून दिल्ली ते सीएसटी असा प्रवास केला होता. या ट्रेनमधून ते सीएसटी स्थानकात उतरले होते. त्या घटनेला उद्या 37 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून अनुपम खेर यांनी आज सीएसटी ते वांद्रे असा हार्बर मार्गाने पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास केला. त्या वेळी त्यांनी काही लोकांशी संवाद साधला. तसेच रेल्वेच्या नियमांचे पालन करा असा संदेशही दिला. 

Web Title: Appeal to senior actor Anupam Kher, passengers do not cross the railway rails